पुणे : पृथ्वीपासून 310 प्रकाशवर्षे दूर असलेल्या ग्रहाला 13 वर्षीय पुणेकराने सुचविलेले नाव देण्यात आले आहे. 'एचडी- 86081बी'या ग्रहाला नऱ्हे परिसरात राहणाऱ्या विद्यासागर दौड या आठवीच्या विद्यार्थ्याने 'संतमस'हे संस्कृत नाव सुचविले होते. देशभरात घेण्यात आलेल्या स्पर्धेत, सर्वाधिक मते मिळालेल्या नावाची घोषणा पॅरिस येथे आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र संघटनेने केली. तसेच 'संतमस' ज्या ताऱ्याभोवती फिरतो त्या ताऱ्याला सुरतच्या 22 वर्षीय अनन्या भट्टाचार्याने सुचविलेले 'बीभा' हे नाव देण्यात आले आहे.
विद्यासागर हा सिंहगड स्प्रिंग डेल पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याने ग्रहाला सुचविलेल्या 'संतमस' या संस्कृत नावाचा अर्थ 'ढगांमध्ये दडलेला' असा होतो. अणुकेंद्रातील 'पाय-मेसॉन' या कणाचा शोध घेणाऱ्या भारतीय महिला वैज्ञानिक डॉ. बीभा चौधरी यांच्या स्मरणार्थ 'ताऱ्या'चे नामकरण 'बीभा' असे करण्यात आले आहे. 'आयएयू'ने घेतलेल्या पत्रकार परिषदेत 112 देशांनी 100 ग्रहताऱ्यांना दिलेली नावे घोषित करण्यात आली आहे.
Video : पहाटेचा 'लिंबूडाव' झाला कॅमेऱ्यात कैद, काय ते पाहा...
अशी झाली स्पर्धा..
भारतीय खगोलशास्त्र संघटनेच्या वतीने देशात ही स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांनी 'ग्रहा'साठी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी "ताऱ्या'साठी नाव सुचवावे असे सांगण्यात आले. 15 ऑगस्टपर्यंत देशभरातून 1 हजार 717 नावांची आवेदन आली. यातून पाच नावे ग्रहासाठी आणि पाच नावे ताऱ्यासाठी निवडण्यात आली. अंतिम नावे निवडण्यासाठी जगभरातून मतदान घेण्यात आले. यामध्ये 5 हजार 587 लोकांनी भाग घेतला होता. सर्वाधिक मते पडलेली ही दोन नावे घोषित करण्यात आली.
पुण्यात रिक्षांच्या डिक्कीचोराचा धुमाकुळ
'बिभा' तारा
- 6 हजार केल्विन तापमान
- सूर्यापेक्षा 1.55 पटीने मोठा, 1.21 पटीने वजनदार
- सूर्यापेक्षा 1.75 पटीने जास्त तेजस्वी
- वय ः 6.21 अब्ज वर्षे
पाणीपुरीवाली आजी सोशल मीडियावर व्हायरल (व्हिडिओ)
"संतमस' ग्रह
- वजन ः गुरु ग्रहापेक्षा 1.5 पटीने जास्त
- त्याच्या ताऱ्याभोवती 2.13 दिवसात एक प्रदक्षिणा पूर्ण करतो.
अन् नागाला पकडणं पडलं महागात
"विद्यासागरने दिलेले नाव एका ताऱ्यासाठी निश्चित करण्यात आल्याने आमच्या संपूर्ण कुटुंबाला खूप आनंद झाला आहे. जुलै महिन्यातच "सकाळ'मध्ये या स्पर्धेसंदर्भात बातमी आली होती. त्यानुसार विद्यासागरने संस्कृतमधील काही नावांचा अभ्यास केला आणि त्यापैकी "संतमस' नाव आम्हाला अधिक समर्पक वाटले. या नावाला देशभरातील लोकांनी पसंती दर्शवत विद्यासागरची निवड सार्थ ठरवली. मुलांमध्ये अवकाश विज्ञानासंबंधी जागृती निर्माण करण्यासाठी अशा स्पर्धा व्हायला हव्यात''
- दिवाण दौड, विद्यासागरचे वडील.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.