Fraud crime esakal
पुणे

Crime News : जादा परताव्याच्या आमिषाने व्यावसायिकांची १४ कोटींची फसवणूक

गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कृषी उद्योगात गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखवून व्यावसायिकांची सुमारे १४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्राथमिक तपासात २४ व्यावसायिकांना गंडा घातल्याचे निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी अकोला येथील एका ६३ वर्षीय व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. त्यावरून चतु:शृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला आहे.

या संदर्भात प्रशांत झाडे (रा. अंबरनाथ, जि. ठाणे), रोहन मताले, संदेश गणपत खामकर (रा. ठाणे), जयंत रामचंद्र बांदेकर (रा. बोरिवली पश्चिम, मुंबई), कमलेश महादेवराव ओझे (रा. कळवा, जि. ठाणे) आणि बाणेर येथील ए. एस. ॲग्री अँड ॲक्वा एलएलपी कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी संगनमत करून काही व्यावसायिकांना कृषी उद्योगात गुंतवणूक केल्यास जादा परताव्याचे देण्याचे आमिष दाखवले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने हळदीचे उत्पादन घेणार आहोत.

कृषी उत्पादनात ही कंपनी अव्वल असल्याची बतावणी करून त्यांनी गुंतवणूकदारांकडून १३ कोटी ८२ लाख ८७ हजार रुपये घेतले. परंतु त्यांना परतावा आणि मुद्दलही परत केले नाही. सन २०१९ पासन हा प्रकार सुरू होता.

फिर्यादीने आरोपींकडे गुंतवणूक करण्यासाठी मोठी रक्कम दिली. परंतु प्रकल्पाबाबत विचारणा केल्यानंतर आरोपींनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासादरम्यान आरोपींनी अशा प्रकारे इतर २३ व्यावसायिक आणि शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक कदम करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Budget : देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेचे बजेट किती? कुठून येतो एवढा पैसा?

MAH-CET 2026 : बी.एड. आणि एलएल.बी. करिअरची दारे उघडली! सीईटी नोंदणी सुरू; 'या' तारखेपर्यंत करा अर्ज

Women’s Premier League: महिला प्रीमियर लीगचा धडाका आजपासून; डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये रंगणार पहिला टप्पा !

Tiger Reserve New Rules : आता वाघाचा फोटो काढणं पडणार महागात! ‘या’ व्याघ्र प्रकल्पाने लागू केले कडक निर्बंध, काय आहेत नवे नियम?

Latest Marathi News Live Update : ‘अजूनही वेळ आहे, काँग्रेसने उमेदवार मागे घ्यावेत’ हसन मुश्रीफ यांचा सतेज पाटीलांना इशारा

SCROLL FOR NEXT