Rain
Rain Sakal
पुणे

पुणे जिल्ह्यात जूनमध्ये १६६ मिलिमीटर पाऊस

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यात (Pune District) जूनच्या पहिल्या तीन आठवड्यात १६६ मिलिमीटर पाऊस (Rain) झाला आहे. जिल्ह्यातील पावसाचे हे प्रमाण जून महिन्यातील सरासरी पावसाच्या तुलनेत ९४ टक्के इतके आहे. जून महिन्यातील सरासरी पाऊस १७६ मिलिमीटर इतका आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३८१ मिलिमिटर पाऊस वेल्हे तालुक्यात तर, सर्वांत कमी केवळ ७९ मिलिमिटर पाऊस हा इंदापूर तालुक्यात झाला आहे. (166 Milimeter Rain in June Month in Pune District)

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत दरवर्षी १ जूनपासून पावसाची नोंद केली जाते. या नोंदीनुसार १ जून ते २१ जून या पहिल्या तीन आठवड्यातच जून महिन्यातील सरासरी पावसाच्या ९४ टक्के पावसाची नोंद झाल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे यांनी सांगितले.

जून महिन्यात तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये (कंसात सरासरी पाऊस)

भोर - २५१ (२०६), वेल्हे - ३८१ (४६५), खेड - १७७ (१२७), आंबेगाव - १७७ (१३४), जुन्नर - १०९ (११५), शिरूर - १०३ (९०), पुरंदर -१०३ (११२), दौंड - १०८ (९५), बारामती - ९९ (८७) आणि इंदापूर - ७९ (१०२).

पुणे जिल्ह्याचा वार्षिक सरासरी पाऊस हा ८४३ मिलिमीटर इतका आहे. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात १ जून ते १५ आक्टोबर या कालावधीत प्रत्यक्षात १ हजार २० मिलिमीटर पाऊस झाला होता. एकूण पावसाचे हे प्रमाण सरासरी पावसाच्या १२३ टक्के इतके नोंदले गेले होते, असेही बोटे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

Cadbury chocolate: कॅडबरी चॉकलेटला लागली बुरशी? ग्राहकाने फोटो शेअर करताच कंपनीने दिलं उत्तर

No Bread Sandwich: सकाळच्या नाश्त्यात बनवा हाय प्रोटिन नो ब्रेड सँडविच, जाणून घ्या रेसिपी

Prakash Ambedkar : सुळे, पाटलांमुळे बारामतीतून माघार ; डॉ. प्रकाश आंबेडकरांनी फोडले गुपित,यंदा खाते उघडणार

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

SCROLL FOR NEXT