Police-Bandobast 
पुणे

थर्टी फर्स्ट, मानवंदना दिनासाठी सतराशे पोलिसांची ‘नजर’

सकाळ वृत्तसेवा

पिंपरी - थर्टी फर्स्ट व कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ मानवंदना दिनाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात येणार आहे. एक हजार ७०० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा त्यात समावेश असेल.

थर्टी फर्स्टच्या दिवशी मद्यपान करून रस्त्यांवर हुल्लडबाजी करणाऱ्यांची संख्या जास्त असते. त्यामुळे अपघातांसह कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होतो. अशा हुल्लडबाजांना आवर घालण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत मंगळवारी (ता. ३१) सकाळपासूनच बंदोबस्त तैनात राहणार आहे. 

नाकाबंदीच्या ठिकाणी ब्रेथ ॲनालायझर मशिनद्वारे वाहनचालकांची तपासणी केली जात आहे. गेल्या आठवड्यात मद्यपान करून वाहन चालविणाऱ्या २५६ जणांवर कारवाई करण्यात आली. पुढील दोन दिवसांत ही कारवाई आणखी तीव्र केली जाणार असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिली; तसेच विजयस्तंभ मानवंदना दिनाच्या पार्श्‍वभूमीवर बुधवारीदेखील (ता. १ जानेवारी) शहरात कडेकोट बंदोबस्त राहणार आहे. गर्दीच्या ठिकाणी अधिकची गस्त असेल. विविध भागांत कोम्बिंग ऑपरेशनही राबविण्यात आले. यामध्ये विविध गुन्ह्यांतील आरोपींची तपासणी करण्यात आली.

वाहतूक मार्गात बदल 
मानवंदना दिनाच्या पार्श्‍वभूमीवर शहर परिसरातील वाहतूक मार्गात बुधवारी (ता. १ जानेवारी) बदल करण्यात आले आहेत. देहूरोड येथे जुन्या महामार्गाने येणारी वाहतूक सेंट्रल चौकातून निगडी, पिंपरी-चिंचवडकडे न जाता ही वाहने सेंट्रल चौकाकडून कात्रज रस्त्याने सरळ वाकड नाका व राधा चौकातून पुढे जातील. मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या सर्व हलक्‍या वाहनांना वडगाव फाटा, सोमाटणे फाटा, सेंट्रल चौक, कात्रज रस्त्याने पुढे जाता येईल. यासह मुंबईकडून द्रुतगती महामार्गाने पुण्याकडे येणाऱ्या वाहनांना उर्से टोल नाका येथून कात्रज रस्त्याने इच्छितस्थळी जाता येईल. मुंबईकडून द्रुतगती महामार्गाने खिंडीतून तळेगावकडे जाणारी वाहने वडगाव फाट्याकडे न जाता उर्से टोल नाका येथून सोमाटणेकडे जाणाऱ्या बाह्यवळण मार्गाने इच्छितस्थळी जातील. नाशिक व तळेगावकडून येणारी वाहने तळेगाव-चाकण चौकातून शिक्रापूरकडे न जाता आळंदी फाटा येथून आळंदीमार्गे इच्छितस्थळी जातील. हा वाहतूक बदल मंगळवारी (ता. ३१) रात्री अकरा ते बुधवारी (ता. १ जानेवारी) रात्री बारा या कालावधीसाठी असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India: वैभव सूर्यवंशीची भारतीय T20 संघात निवड, शुभमन गिलसोबत सलामी; महान क्रिकेटपटूने निवडला संघ

Pune Parvati Crime : पर्वतीतील नऊ वर्षीय मुलीवरीरील अत्याचारप्रकरणी आरोपीवर कठोर कारवाईची डॉ. नीलम गोऱ्हे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी

Maharashtra NPS Reform: राज्य शासनाचा मोठा निर्णय: सुधारित एनपीएसमुळे शिक्षक व शासकीय कर्मचाऱ्यांना हमी निवृत्तीवेतन

Pune Crime : नातीसोबत बसलेलो, शेजारच्या महिलेनं अफवा पसरवली; पर्वती प्रकरणातील आजोबाचं कोर्टात उत्तर, ३ दिवस पोलीस कोठडी

Theur Crime : थेऊरमध्ये ६ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न; आरोपीला तात्काळ अटक

SCROLL FOR NEXT