Corona-Maharashtra 
पुणे

पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी; कोरोनाचे 18 रुग्ण बरे झाले!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोना रुग्णांच्या वाढणाऱ्या आकड्यांनी पुणेकरांच्या चिंतेत भर पडली असतानाच रविवारी (ता.१९) मात्र पुणेकरांना चांगला दिलासा मिळाला आहे. कोरोनाची लागण झालेले 18 जण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. एवढे नाही तर दिवसभरातही एकाचाही मृत्यू झालेला नाही. मात्र, नव्या 42 रुग्ण सापडल्याने ही संख्या 592 पर्यंत गेली आहे. 

शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत असून, शनिवारी सायंकाळी पाच वाजता संपलेल्या चोवीस तासांत सर्वाधिक 78 रुग्ण सापडले आहे. त्याआधी सलग तीन दिवस रोज 50 ते 65 इतके रुग्ण सापडल्याने पुणेकर धास्तावले आहेत. तसेच, मृतांची संख्याही कायम राहिल्याने भीती पसरली होती.

या पार्श्‍वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून उपचार घेत असलेले 18 रुग्ण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आल्याचे महापालिकेच्या आरोग्य खात्याने कळविले आहे. परंतु, पुढील काही दिवस घराच विलग राहण्याचा सल्लाही या लोकांना देण्यात आला आहे. 

गंभीर बाब म्हणजे, डॉ. नायडू हॉस्पिटलसह खासगी रुग्णालयांत उपचार घेत असलेल्या 15 जणांची प्रकृती गंभीर आहे. घरी सोडलेल्या रुग्णांच्या चाचण्या घेण्यात आल्या त्या निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख डॉ. रामचंद्र हंकारे यांनी स्पष्ट केले. 

पुणे शहरात आतापर्यंत 3 हजार 787 जणांच्या घशांतील द्रव पदार्थाच्या (स्वॅब) नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून, त्यापैकी 3 हजार 207 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. डॉ. नायडू हॉस्पिटलमध्ये 181 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Tendulkar Wedding : गणपती बाप्पाचा आशीर्वाद! अर्जुन-सानियाच्या लग्नासाठी तेंडुलकर कुटूंब पोहोचले 'खास' ठिकाणी; सचिन म्हणाला, जेव्हा मुलगा एका मुलीला घरी घेऊन येतो तेव्हा...

Romance Scam : ऑनलाइन प्रेम की गोड विष? 'I Love You' म्हणून रिकामं करत आहेत बँक अकाऊंट; रोमॅन्स स्कॅमचं 'ते' सत्य तुम्हाला रडवून टाकेल

Sangli Accused :पलूसमध्ये फसवणूक प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई; चारचाकी व शेअर मार्केट घोटाळ्यात दोघे ताब्यात

IND vs ZIM, T20 WC: संजू सॅमसनला संधी दिली जाणार का? भारतीय प्रशिक्षकाचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, आमचे दोन्ही ओपनर डावखुरे आहेत...

T20 WC, IND vs ZIM: संजू सॅमसन, अक्षर पटेलचं पुनरागमन होणार, पण मग कोणाला मिळणार डच्चू? अशी असेल भारताची Playing XI

SCROLL FOR NEXT