corona logo1.jpg 
पुणे

कोथरुडकरांनो सावधान! कोरोनाचा वाढतोयं धोका...

सकाळवृत्तसेवा

कोथरुड (पुणे) : येथील एका कोरोना रुग्णाचा मृत्यू आणि नव्याने दोन कोरोना रुग्ण आढळल्याने कोथरुडकरांची चिंता वाढली आहे. कोथरुडमध्ये शास्रीनगर परिसरात राहणा-या एका कोरोना बाधित वयोवृध्द महिलेचा मृत्यू दोन दिवसापूर्वी झाला. त्यानंतर वस्ती भागात राहणा-या एक गरोदर महिलेला व ज्येष्ठ नागरिकाला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

गरोदर महिला ही हडपसर भागातील असून क्वारंटाइन व्हायला सांगितले म्हणून ती कोथरुड भागात निघून आली होती. ज्येष्ठ नागरीक हा शास्रीनगर भागातीलच असून अगोदर सापडलेल्या चार रुग्णांच्या घराजवळच यांचे घर आहे. सध्या कोथरुडमध्ये पाच कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्याचे काम महापालिकेच्या आरोग्य विभागाने सुरु केले आहे. या तपासणी अहवालात काय आढळते. याकडे कोथरुडकरांचे डोळे लागले आहेत.

परदेशातून कोथरुडमध्ये आलेल्या व्यक्तीला कोरोना झाल्याचे २३ मार्चला समजले. त्यानंतर २६ एप्रिल रोजी दुसरा रुग्ण आढळला. त्यानंतर कोथरूडमधील रूग्ण संख्या वाढू  लागली.  दरम्यान 12  मे रोजी  कोथरूड मधील वस्ती भागात प्रथमच कोरोना रूग्ण  आढळला.  दवाखान्यात असलेल्या आईला,  त्यानंतर मुलाला आणि नातवाला कोरोना असल्याचे आढळले.  या कुटुंबाच्या संपर्कात आलेल्या दुकानदार महिलेची  कोरोना तपासणी पाॅझिटीव्ह आली. अशातच रूग्णालयात दाखल असलेल्या वयोवृद्ध कोरोना बाधित महिलेचा मृत्यू झाला.  आणि दोनच दिवसात याच परिसरात असलेल्या एका ज्येष्ठाची चाचणी पाॅझीटीव्ह आली. त्यांना गुडघेदुखीचा त्रास होत होता.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

एकाच परिसरातील पाच जण पाॅझिटीव्ह आढळल्याने आता ही संख्या  वाढेल या चिंतेने परिसरातील नागरिक चिंतीत आहेत. 
पौडरस्त्यावर असलेल्या वस्ती भागात बाहेरून आलेली महिला पाॅझिटीव्ह असल्याचे समजल्याने आजवर रोखलेला कोरोना नियंत्रणा बाहेर जातोय की काय असे वाटू लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed News : जिल्हाधिकारी थेट विद्यार्थ्यांच्या रांगेत जमीनवर बसले; डिघोळआंबा शाळेत अन्नाचा आस्वाद घेत 'सरप्राइज स्टिंग'

58 वर्षांनंतर नवरात्रीत बनतोय दुर्मीळ योग! ‘या’ 3 राशींवर होणार विशेष कृपा म्हणे; पैसा, नोकरी अन् व्यवसायात मिळू शकतो मोठा फायदा

India T20 Squad : भुवनेश्वर कुमारचे ४ वर्षांनी पुनरागमन! न्यूझीलंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा, वैभव सूर्यवंशीचीही निवड

Marathi News Live Updates: कसबा मंदिरातील दानपेटी फोडली

IND vs WI, 1st T20I: शे होप पुन्हा नडला, पण पदार्पणवीर नमन धीरने दाखवला इंगा! रुदरफोर्डच्या आक्रमणाने विंडिज १७० धावा पार

SCROLL FOR NEXT