Admission of students in the first round of eleventh admission 
पुणे

अकरावी अ‍ॅडमिशनच्या पहिल्या फेरीत 'एवढ्या' विद्यार्थ्यांना प्रवेश

सकाळवृत्तसेवा

पहिल्या फेरीत २३ हजार ६०२ विद्यार्थ्यांना प्रवेश

पुणे :अकरावी प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित गुणवत्ता यादीतील २३ हजार ६०२ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतला आहे. या फेरीतील प्रवेशासाठी एक दिवसाची मुदतवाढ देण्यात आली होती. परंतु या एका दिवसांत केवळ एक हजार १४९ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष प्रवेश घेतल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

अकरावी प्रवेशाच्या पहिल्या फेरीत ४० हजार १३ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला होता. मात्र यापूर्वी दिलेल्या मुदतीत म्हणजे गुरूवारपर्यंत एकूण २२, हजार ४५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला, तर दरम्यान या फेरीतील प्रवेशासाठी शुक्रवारपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली होती. या मुदतीत फक्त एक हजार १४९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याचे निदर्शनास आले आहे. पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ ५८.९८ टक्के विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. या फेरीत शुक्रवारपर्यंत २५ हजार ६४६ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी समंती दर्शविला, तर १४ हजार ३६७ विद्यार्थ्यांनी अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, असे इयत्ता अकरावी प्रवेश नियंत्रण समितीच्या सचिव मीना शेंडकर यांनी सांगितले.

अबब! पुणे जिल्ह्यात मास्क न वापरणाऱ्यांना ठोठावला तब्बल सव्वा कोटींचा दंड​

पहिल्या नियमित गुणवत्ता यादीतील प्राधान्यक्रमानुसार झालेले प्रवेश :

- प्राधान्यक्रम : निवड झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या : प्रवेशासाठी समंती दर्शविलेले विद्यार्थी: प्रत्यक्ष प्रवेश घेतलेले विद्यार्थी : प्रवेश नाकारलेले विद्यार्थी : प्रवेश रद्द केलेले विद्यार्थी : समंती दर्शवून प्रवेश न घेतलेले विद्यार्थी :  प्रतिसाद न दिलेले विद्यार्थी
- १ : १९,५७५ : १६,९७० : १६,३०४ : ३८ : ४१ : ५८७ : २६०५
- २ : ६,७०२ : ३,८१० : ३,४१० : ९ : ३५ : ३५६ : २,८९२
- ३ : ४,१७४ : १,९०९ : १,६११ : २ : २० : २७६ : २,२६५
- ४ : २,८४० : १,०७८ : ८६५ : १ : १५: १९७ : १,७६२
- ५ : २,१३८ : ६८५ : ५३३ : ० : १२ : १४० : १,४५३

..
शाखानिहाय झालेल्या प्रवेशाची आकडेवारी :
शाखा : पहिल्या फेरीत निवडलेले विद्यार्थी : प्रवेशासाठी समंती दर्शविलेले विद्यार्थी: प्रत्यक्ष प्रवेश घेतलेले विद्यार्थी
- कला : ४,३३२ : २,७५२ : २,५४१
- वाणिज्य : १६,२२३ : १०,११४ : ९,३४५
- विज्ञान : १८,६४३ : १२,०६८ : ११,०३१
- एचएसव्हीसी : ८१५ : ७१२ : ६८५

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 : भारताचा आज ओमानविरुद्ध अखेरचा साखळी सामना; संजू सॅमसन, जसप्रीत बुमराहला विश्रांती? कशी असेल प्लेईंग XI?

Morning Breakfast Recipe: सकाळच्या नाश्त्याला इडली-पोह्याचा कंटाळा आलाय? मग बनवा झटपट सुरतचा फेमस लोचो, लगेच नोट करा रेसिपी

Latest Marathi News Updates : अंबाबाई देवीच्या दागिन्यांना झळाळी, पोलिस अधीक्षकांची मंदिर परिसराला भेट; सुरक्षिततेबाबत सूचना

Panchang 19 September 2025: आजच्या दिवशी देवी कवच स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

SCROLL FOR NEXT