Khadakwasala Dam
Khadakwasala Dam Sakal
पुणे

खडकवासला धरणातून २८ हजार क्युसेक विसर्ग धोक्याचा

सकाळ वृत्तसेवा

पुणे - शहरातून वाहणाऱ्या मुळ-मुठा नद्यांना पूर (Mula Mutha River Flood) आला की, परिसरातील नागरिकांच्या चिंतेत दरवर्षी भर पडते. आपल्या वस्तीत, सोसायटीमध्ये पाणी (Water) शिरते की काय, अशी त्यांना भीती वाटते. गेल्या तीन दिवसांपासून खडकवासला धरण (Khadakwasala Dam) साखळीत मुसळधार पाऊस झाला असून धरणांतून सोडण्यात येणारे पाणी नियंत्रित केले जात आहे. यामुळे अद्याप तरी गंभीर पूरस्थिती निर्माण झाली नाही. या पार्श्वभूमीवर धरणांतून विसर्ग वाढल्यास शहरातील कोणत्या भागाला फटका बसू शकतो, याची यादी महापालिका प्रशासनाने तयार केली आहे. दरम्यान, नदीत २८ हजार क्युसेकच्या पुढे पाणी सोडल्यास शहरातील विविध भागांतील मानवी वस्त्यांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण होतो. (28000 Cusec Discharge from Khadakwasla Dam is Dangerous)

खडकवासला धरणातून १८ हजार क्युसेक पाणी नदीत सोडल्यानंतर डेक्कन येथील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेल्यानंतर दरवर्षी वाहतुकीला फटका बसतो. धरणातून नदीपात्रात २८ हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यानंतर गरवारे महाविद्यालयाजवळील खिलारे वस्तीमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात होते, असे आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे सांगण्यात आले आहे.

या ठिकाणी शिरते पाणी...

बंडगार्डन पुलाजवळ नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यास शहराच्या हद्दीतील नऊ ठिकाणी पाणी शिरते. कळस येथील सर्वे क्रमांक सहा व ८८ परिसरातील ओढा व नदीलगतची झोपटपट्टी, येरवडा येथील शांतिनगर, टॅंक रस्ता येथील स्मशानभूमी, इंदिरानगर झोपडपट्टी व सादलबाबा दर्ग्याजवळचा भाग, औंध येथील जुन्या पुलाजवळील भाग, बोपोडी येथील हॅरिस पुलाजवळील झोपडपट्टी, संगमवाडी येथील नाईक बेटाजवळचा भाग, मुळा रस्ता झोपडपट्टी आणि पाटील इस्टेट झोपडपट्टीला या पुराचा फटका बसतो.

एक क्युसेक म्हणजे किती

धरणातून सोडल्या जाणाऱ्या पाण्यासाठी ‘क्युसेक’ हे एकक वापरले जाते. एक क्युसेक म्हणजे एका सेकंदात धरणातून एक घनफुट पाणी सोडले जाते. एक घटफूट म्हणजे २८.३२ लिटर पाणीइतके प्रमाण आहे.

एवढ्या विसर्गानंतर या भागांना धोका

  • भिडे पूल : १८ हजार क्युसेक

  • खिलारे वस्ती : २८ हजार क्युसेक

  • कामगार पुतळा परिसर : ३० हजार क्युसेक

  • पुलाची वाडी : ३५ हजार क्युसेक

  • तोफखाना परिसर, डेक्कन पीएमपीएल बसथांब्याच्या मागील बाजू : ४० हजार क्युसेक

  • पूना हॉस्पिटलचा मागचा भाग, नारायण पेठ, अमृतेश्‍वर मंदिर शनिवार पेठ, नेने घाट शेख सल्ला दर्गा, मनपा वसाहत कसबा पेठ, मंगळवार पेठ, ताडीवाला रस्ता : ४५ हजार क्युसेक

  • शिवणेतील नदीलगतचा भाग, हिंगणे, अलंकार पोलिस चौकी जवळचा कर्वेनगर रस्ता : ५० हजार क्युसेक

  • जयंतराव टिळक पूल पाण्याखाली जातो : ५४ हजार क्युसेक

  • कोंढवे-धावडे, भीमनगर ओढ्यालगतचा भाग, न्यू कोपरे हद्द, उत्तमनगर इंदिरानगर वसाहत, नांदेड नदी लगतचा भाग, वडगाव बुद्रुक सर्वे क्रमांक १४ व १५, हिंगणे खुर्द सर्वे क्रमांक १८, अंबिल ओढा लगतचा भाग, दत्तवाडी व राजेंद्रनगर : ५५ हजार क्युसेक

  • पाटील इस्टेट झोपडपट्टी : ६० हजार क्युसेक

मुळा-मुठा नद्यांना पूर आल्यानंतर कोणत्या भागात पाणी शिरू शकते, याची माहिती महापालिकेकडे आहे. नद्यांनी धोक्याची पाणीपातळी ओलांडल्यास आवश्यक त्या ठिकाणी त्वरित मदतकार्य करून नागरिकांचे स्थलांतर केले जाते.

- माधव जगताप, उपायुक्त, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौसमोर मुंबईनं नांगी टाकली; 5 षटकात 4 फलंदाज तंबूत

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT