3 year old Radhyani from Pune set a world record about solar system 
पुणे

व्वा, खगोलप्रेमाला उमपा नाही! पुण्यातील 3 वर्षांच्या राध्यनीने रचला जागतिक विक्रम

सकाळवृत्तसेवा

पुणे ः वयाचे अवघी तीन वर्षे आणि सहा महिने पूर्ण करणाऱ्या राध्यनी राहुल देवतळे या चिमुरडीने सुर्यमाले विषयीच्या ज्ञानाच्या जोरावर जागतिक रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. सुर्यमालेशी निगडित 45 प्रश्‍नांची उत्तरे फक्त तीन मिनिटे पन्नास सेकंदात देत तिने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, आशिया बुक ऑफ रेकॉर्ड, ग्लोबल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आपले नाव प्रस्थापित केले आहे. इतक्‍या कमी वयात असे रेकॉर्ड करणारी ती पहिली भारतीय मुलगी ठरली आहे. 


 

नांदेड सिटीचे रहिवासी असलेल्या राहुल आणि नीलम यांची ही कन्या समजायला लागल्यापासून चंद्र, सुर्यासह रात्रीच्या तारकांकडे कुतूहलाने पाहत असते. तिच्या याबद्दलच्या अनेक प्रश्‍नांनी या दाम्पत्याचीही बौद्धिक कसरत होते. परंतु, तिच्या शंकांचे निरसन अगदी तिच्या भाषेत करण्याचा चंगच यांनी बांधला आहे. नीलम सांगतात,"दोन वर्षांची असताना ती चंद्राकडे पाहून नमस्कार करायची. मला वाटले प्रत्येक मुलाला चंद्राबद्दल आकर्षण असते. त्याच भावनेतून ही करत असेल. पण, जेंव्हा मुंबईला नेहरू प्लॅनेटोरीअममध्ये मी तिला घेऊन गेले त्यानंतर तिच्या प्रश्‍नांचा आणि विचारांचा आवाका वाढतच गेला. तिच्या अनेक प्रश्‍नांची उत्तरे देताना आमची दमछाक होते.'' 

राध्यनी सध्या नांदेड सिटीच्या पवार पब्लिक स्कुलच्या नर्सरीमध्ये ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेत आहे. तिच्या या रेकॉर्डबद्दल अभिमान असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ.अंजली गुर्जर सांगतात. राध्यनीच्या तल्लख बुद्धिमत्तेला बौद्धिक खाद्य पुरविण्यात कमी पडायचे नाही, असा निर्धारच या दाम्पत्याने केला आहे.

जबाबदारी स्वीकारणारेच यशस्वी ठरतात; पंतप्रधान मोदींचा विद्यार्थ्यांना मूलमंत्र

विशेष म्हणजे निव्वळ घोकंपट्टी न करता, ते तिच्या बालबुद्धीला पटेल अशा भाषेत सूर्यमालेतील ग्रह, त्यांचा क्रम, वस्तुमान, रंग आदी गोष्टी समजावून सांगत आहे. आवश्‍यक तेथे व्हिडीओंचा आधारही ते घेतात. सध्या तिचे मानवी उत्क्रांतीबद्दल कुतूहल जागृत झाल्याचे नीलम सांगतात. तसेच तिला पुढील खगोल विज्ञान शिकविण्यासाठी आणि संकल्पनांचा विकास करण्यासाठी तिच्या शाळा उघडण्याची वाट ते पाहत आहे. कारण राध्यनीने अजून शाळेचे तोंडही पाहिलेले नाही. 
 
''मुलांमधील योग्य गुण ओळखून त्यांना वेळीच प्रोत्साहन द्यायला हवे. त्याच्या बुद्धीला पटेल अशा भाषेत त्यांच्या शंकांचे निरसन करायला हवे. असे मार्गदर्शन लाभल्यास प्रत्येक मुलगा यशाच्या शिखराकडे जाऊ शकतो.''
- नीलम देवतळे, राध्यनीची आई. 

Corona Updates: दिवाळीनंतर कोरोनाचा प्रसार वाढला; 24 तासांत 45 हजारांपेक्षा जास्त रुग्ण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video : समोरा समोर दोन बसची भयानक टक्कर; अपघाताचा थरारक व्हिडिओ व्हायरल, पाहून शॉक व्हाल..

IND vs ENG 2nd Test : रवींद्र जडेजाने 'तलवार' उपसली! कपिल देव यांचा विक्रम मोडला, Sobers सारख्या दिग्गजांसोबत जाऊन बसला

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेकडून बाळासाहेब लांडगे यांचं निलंबन

बाबा वेंगाचं भाकीत खरं ठरणार? पुढच्या 6 महिन्यात 'या' 4 राशी करोडपती होणार? कोणत्या त्या राशी जाणून घ्या...

Pune Accident: बसची वाट बघत उभे होते, तेव्हाच टेम्पो काळ बनून आला अन्..., दोघांचा जागीच मृत्यू, घटनेने पुण्यात खळबळ

SCROLL FOR NEXT