manchar 
पुणे

यूपीतून 33 जण मंचरला आले, तेही एका पिकअपमध्ये !   

डी. के. वळसे पाटील

मंचर (पुणे) :  उत्तर प्रदेशातून पिकप गाडीमध्ये दाटीवाटीने बसून प्रवास करणारे 33 जण पुणे-नाशिक रस्त्यावर मंचर (ता. आंबेगाव) येथे गुरुवारी (ता. २७) दुपारी दीड वाजता आढळले. त्यामुळे संबंधित पिकअप गाडी अडवून पोलिसांनी चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. ही गाडी आळेफाटा व नारायणगाव येथून मंचरच्या दिशेला आली. पण, तेथील पोलिसांनी सोशल डिस्टन्सचा बोजवारा उडत असतानाही बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे त्यांच्या कार्यपद्धतीविषयी संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.

टेमघर धरणाची पाणीगळती 96 टक्के रोखण्यात यश
     
जिल्हाधिकारी राजेश देशमुख व जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी बुधवारी (ता. २६) आंबेगाव- जुन्नर तालुक्याचा दौरा   केला. कोविडच्या पार्श्वभूमीवर संसर्ग झालेल्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन त्यांनी चिंता व्यक्त केली. मंचर, घोडेगाव, नारायणगाव, आळेफाटा, जुन्नर, ओतूर येथील पोलिस ठाण्यातील प्रभारींना सक्त आदेश देण्यात आले की, सोशल डिस्टन्स व प्रमाणित मास्क न वापरणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हे दाखल करावेत. पण, भरदिवसा पिकअप गाडीत असलेली गर्दी रस्त्यावर बंदोबस्तासाठी असलेल्या नारायणगाव व आळेफाटा पोलिसांच्या नजरेत आली नाही का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोम्पे, पोलिस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी मंचर शहरात प्रमाणित मास्क न वापरणारे व सोशल डिस्टन्सची अंमलबजावणी न करणारे मंचर येथील नागरिक व व्यापारी, अशा सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई सुरू असतानाच पिकप गाडीमध्ये दाटीवाटीत लोक बसल्याचे त्यांनी पाहिले. मंचर पोलिसांनी संबंधित पिकअप (यु.पी.९० ए.टी.०८०१) गाडी थांबवली. चालक रमेश बदलावा कुमार (वय ३५, रा. तिलकनगर, ता. आत्राम, जि. बाडा, उत्तरप्रदेश) याच्या विरोधात मंचर पोलिसांनी कारवाई केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

युद्धामुळे कंडोम तुटवड्याचा धोका, इंडस्ट्रीला कच्चा माल मिळेना; उत्पादन घटले

Maharashtra property ready reckoner rates unchanged: मालमत्ता व्यवहारांना दिलासा: रेडी रेकनर दर स्थिर, पण जाचक तळटीपा कायमच

Baramati News : साडेसहा हजार मृत मतदार बारामती तालुक्यात वगळले; मतदारयादी अचूक करण्यासाठी मोहीम

Ashok Kharat खरातचा महिलांवर अत्याचार, एकही गर्भवती नाही? कुठली औषधं द्यायचा? डॉक्टर पोलिसांच्या रडारवर

PBKS vs RR Live : युझवेंद्र चहलने घेतली शुभमन गिलची 'फिरकी'! अर्शदीप सिंगची १२ चेंडूंची ओव्हर, सारेच चक्रावले

SCROLL FOR NEXT