Corona-Test 
पुणे

पुण्यात कोरोनाने कहरच केला; कोरोना रुग्णांनी ओलांडला साडेतीन हजारांचा टप्पा!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि ग्रामीण भागात मिळून गुरुवारी (ता.३०) जिल्ह्यातील दिवसभरातील नव्या कोरोना रुग्णांनी पहिल्यांदाच साडेतीन हजारांचा आकडा ओलांडला आहे. गुरुवारी तब्बल तीन हजार ६५८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये फक्त पुणे शहरातील दोन हजार ४०२ रुग्णांचा समावेश आहे.

गुरुवारच्या या आकडेवारीमुळे याआधीचा दिवसभरातील सर्वाधिक कोरोना रुग्णांचा उच्चांक मोडला गेला आहे. याआधी २२ जुलैला एकाच दिवसात तीन हजार २१८ रुग्णांचा उच्चांक नोंदला गेला होता. त्यानंतर गुरुवारी म्हणजेच केवळ आठ दिवसातच पूर्वीचा उच्चांक मोडला आहे. 

यामुळे गुरुवारी जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या ८१ हजार ६७१ झाली आहे. याशिवाय आतापर्यंत १ हजार ९२२ मृत्यू झाले आहेत.

गुरुवारी दिवसभरातील एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील २ हजार ४०२, पिंपरी चिंचवडमधील ८९३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २२० आणि नगरपालिका व कॅंंटोन्मेंट बोर्डातील मिळून १४३ रुग्णांचा समावेश आहे. बुधवारी (ता.२९) रात्री ९ वाजल्यापासून गुरुवारी (ता.३०) रात्री नऊ वाजेपर्यंतची ही आकडेवारी आहे.

दरम्यान, गुरुवारी दिवसभरात ६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ३० जण आहेत. याशिवाय पिंपरी चिंचवडमधील १९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १२ आणि नगरपालिका आणि कॅंंटोन्मेंट बोर्डातील मिळून तिघा जणांचा समावेश आहे.

एकूणात १०४५ रुग्ण वाढले 

जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरातील नव्या रुग्णांच्या संख्येत बुधवारच्या तुलनेत १ हजार ४५ रुग्ण वाढले आहेत. बुधवारी हा आकडा २ हजार ६२३ होता. शिवाय गुरुवारी पुणे शहरातील रुग्णही १ हजार ९४ ने वाढले आहेत. 

जिल्ह्यातील क्षेत्रनिहाय एकूण रुग्ण (कंसात मृत्यू)

- पुणे शहर - ५१ हजार ६२९ (१३५५).

- पिंपरी चिंचवड - २० हजार ६८६ (३७१).

- जिल्हा परिषद - ५ हजार ९०७ (१९६ नगरपालिका कॅंटोन्मेंट बोर्डासह).

- नगरपालिका आणि कॅंंटोन्मेंट बोर्डासह - ३ हजार ४४९.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भाजप कार्यकर्त्याची जेवणासाठी हाणामारी, आमदारांनी घेतलेल्या बैठकीनंतर एकमेकांच्या अंगावर गेले धावून; VIDEO VIRAL

Solapur Pune Highway Accident : ओव्हरटेक करताना कंटेनरला धडक, स्कॉर्पिओचा चुराडा; २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, दोघे गंभीर

CNG PNG Supply : सीएनजी-पीएनजी पुरवठ्याला गती; पुणे, पिंपरीमधील गॅस वितरण व्यवस्था अधिक सक्षम

विद्यानंद बापट यांचा २२ वर्षांपूर्वी उदय सामंत यांनी केलेला सत्कार; फोटो होतोय VIRAL

IIT Bombay Hostel: विद्यार्थ्याने गळफास घेतल्यानंतर 'आयआयटी'कडून मोठं पाऊल; छतावील पंख्यांऐवजी भिंतीवरील पंखे मागवले

SCROLL FOR NEXT