corona update.jpg 
पुणे

पुणे जिल्ह्यात 3787 नवे कोरोना रुग्ण;  76 जणांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे : जिल्ह्यात गुरुवारी 3 हजार 787 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 81 हजार 69 झाली आहे. आजच्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 1 हजार 764 जण आहेत. दरम्यान, 76 जणांचा मृत्यू झाला आहे. 
आज दिवसभरात आढळून आलेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील 977 , जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 774, नगरपालिका क्षेत्रात 196 आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात 76 रुग्णांचा समावेश आहे. 

गेल्या चोवीस तासांत मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 28 रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील 12, जिल्हा परिषद क्षेत्रातील 24, नगरपालिका क्षेत्रातील 12 जण आहेत. आज कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही. नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही काल (ता. 2) रात्री 9 वाजल्यापासून आज (ता. 3) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे. 

दरम्यान, आज 7 हजार 323 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे कोरोनामुक्त एकूण रुग्णांची संख्या 1 लाख 44 हजार 961 झाली आहे. आतापर्यंत 4 हजार 333 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 129 जण आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिनेसृष्टीला धक्का! 'वेलकम' फेम अभिनेत्याचं वयाच्या ५६व्या वर्षी निधन; 15 दिवसांपासून होते इस्पितळात

Nagpur News : आई-बाबा मला माफ करा; तरुण अधिवक्‍त्याने गळफास घेऊन संपविले जीवन

Empress Garden : एम्प्रेस गार्डनच्या जागेवर न्यायालयीन बांधकामास विरोध; १३४ वर्षांचा ऐतिहासिक वारसा उद्ध्वस्त करण्याचा डाव

Gyanesh Kumar Impeachment : मुख्य निवडणूक आयुक्तांवर महाभियोग चालवण्याची तयारी! ज्ञानेश कुमार यांच्या अडचणीत वाढ? विरोधी पक्ष संसदेत मांडणार प्रस्ताव!

IND vs WI, Live Streaming: भारत-वेस्ट इंडिज संघात ३ वनडे अन् ५ टी२० सामन्यांचा रोमांच! कधी, कुठे अन् किती वाजता पाहाणार मॅच?

SCROLL FOR NEXT