Pune-Police 
पुणे

Lockdown : 'वेल डन पुणे पोलिस'; तुमच्यामुळे 'ते' परदेशी नागरिक पोचले त्यांच्या स्वदेशी!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : संचारबंदीमुळे शहरात अडकून पडलेल्या जगभरातील १२ देशांमधील तब्बल ४५५ परदेशी नागरिकांना पुणे पोलिसांनी त्यांच्या देशात जाण्यासाठी मदत केली.

संबंधीत देशांच्या दूतावासातील अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून पोलिसांनी परदेशी ननागरिकांना परत पाठवून दिले. कोरोनाच्या संसर्गामुळे शहरात संचारबंदी लागू करण्यात आली. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी शहरात वास्तव्य करणारे परदेशी नागरिकांना त्यांच्या देशात परतणे अवघड झाले होते.

दरम्यान, संचारबंदी सुरू असतानाच विविध देशातील दूतावासांनी भारतातील विविध शहरात अडकलेल्या परदेशी नागरिकांच्या मदतीसाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यास पुणे पोलिसांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. बहुतांश देशांनी आपल्या नागरिकांना परत नेण्यासाठी विशेष विमानाची व्यवस्था केली होती. त्यानुसार, शहरात अडकलेल्या ४५५ परदेशी नागरिकांना पुणे-मुंबई प्रवासाची सवलत देऊन त्यांना मायदेशी रवाना होण्यासाठी मदत करण्यात आली. 

इंग्लडमधील ७, कॅनडातील ४, अमेरिकेतील १३१, जपानमधील ६, स्वीडनमधील ६, ब्राझीलमधील ३, आर्यलंडमधील ४, ऑस्ट्रेलियामधील १, जर्मनीतील १५०, फ्रान्समधील १६, रोमानियातील १ आणि बहरीनमधील १२५ नागरिकांना विशेष प्रवास सवलत देण्यात आली. 

पोलीस आयुक्त डॉ. के. वेंकटेशम, पोलिस सहआयुक्त डॉ.रवींद्र शिसवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त बच्चन सिंह, पोलीस निरीक्षक शिल्पा चव्हाण, राजेंद्र पोळ यांनी परदेशी नागरिकांना प्रवाशाची सवलत देण्यासाठी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT