Corona-Test 
पुणे

पुणे कॅन्टोन्मेंट आणि खडकवासल्यातील ७० कोरोना संशयितांची तपासणी; काहींचे रिपोर्ट पॉझिटिव्ह!

सकाळ वृत्तसेवा

कॅन्टोन्मेंट : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालयातील आयसोलेशन कक्षात गुरूवारी (ता.16) 47 कोरोना संशयित रूग्णांना दाखल करण्यात आले. या पैकी आतापर्यत 28 जणांची फ्लॉट आणि नेझल स्वॅबची तपासणी करण्यात आली असून, त्यामध्ये 5 जण पॉझिटिव्ह आले आहेत. अजून 19 जणांची नेझल स्वॅब टेस्ट करणे बाकी आहे. 

दरम्यान, उर्वरित 23 जणांना डिसचार्ज देण्यात येणार आहे. मात्र, त्यांना 14 दिवस होम क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे, अशी माहिती पटेल रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. विद्याधर गायकवाड यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात सुमारे 70 बेडच्या आयसोलेशन वॉर्डची उभारणी करण्यात आली आहे. तसेच आयसोलेशन वॉर्डमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची 8 ऐवजी 6 तास ड्युटी करण्यात आल्याचे डॉक्टरांनी माहिती देताना सांगितले. कॅन्टोन्मेंट भागातील सध्या एकही रुग्ण रुग्णालयात दाखल नसून सर्व रुग्ण मनपा आणि बाहेरील भागातील आहे.

खडकवासला परिसरातील 23 जणांची तपासणी

हवेली तालुक्याच्या पश्चिम भागातून कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्या 23 जणांना तपासणीसाठी रुग्णालयात पाठविले आहे, अशी माहिती हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिली. 

खडकवासला परिसरात आत्तापर्यंत 4 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. खडकवासला, खानापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. त्या नागरिकांना शोधण्याचे काम खानापूर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विनी पाटील आणि खडकवासला येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. वंदना गवळी यांच्यावर होती.

चार दिवसांपूर्वी वेल्हे तालुक्यातील मृत व्यक्ती ज्या कंपनीत कामाला होता. त्या कंपनीतील 10 कामगार हे हवेली तालुक्यात राहतात. यामुळे, त्या सर्व कामगारांना खानापूर आरोग्य केंद्रामार्फत कोरोनाची तपासणी करण्यासाठी पाठवले आहे. त्याचप्रमाणे खडकवासला परिसरात बुधवारी एका कुटुंबातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्याच्या कुटुंबातील चारही सदस्यांना तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. 

आंबेगाव, जांभूळवाडी परिसरातील एका व्यक्तीने कोरोनाची खाजगी तपासणी केली. त्यात त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे, तर त्याच्या घरातील नऊ सदस्यांना तपासणीसाठी पाठविले आहे, अशी माहिती शिर्के आणि डॉ. खरात यांनी यावेळी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

El Nino Impact on Rabi Crops : एल निनोचा विळखा! रब्बी हंगामात अन्नधान्य उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता; कृषी सचिवांनी व्यक्त केली चिंता

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापुरात बिबट्याची दहशत! थेट फुलेवाडी-लक्षतीर्थ मार्गावर झेप घेत उसाच्या शेतात शिरला, मानवी वस्तीत भीतीचं वातावरण; वन विभाग-पोलिस यंत्रणा सतर्क

IIT Bombay Case: कॉपी केल्याचा साहिलला पश्चात्ताप, मित्र-मैत्रिणीला फोन केल्याचे पोलिस तपासात उघड

Marathi News Live Updates: ठाकरे बंधूंची आज शिवतीर्थावर पत्रकार परिषद; एसआयआर प्रक्रियेसह निवडणूक आयोगाच्या मुद्द्यांवर भूमिका मांडणार

ढिंग टांग : आत्ता होता, गेला कुठे..?

SCROLL FOR NEXT