SULE.jpg 
पुणे

Video : महाराष्ट्रातील मुलींच्या मदतीसाठी सुप्रिया सुळे आल्या धावून; वाचा सविस्तर बातमी

सकाळवृत्तसेवा

पुणे : सेट-नेटची तयारी करण्यासाठी हैदराबाद येथे जाऊन गेल्या दीड महिन्यापासून अडकून पडलेल्या ४९ महाविद्यालयीन युवतींना खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रात परतणे शक्य झाले.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून क्लाससाठी गेलेल्या या मुली आपापल्या घरी पोहोचल्यानंतर त्यांच्या बरोबरच त्यांच्या कुटुंबियांनीही सुळे यांचे आभार मानले आहेत. या सर्व मुलींसोबत असलेल्या सातारा जिल्ह्यातील प्रज्ञा साळुंखे आणि येवला तालुक्यातील विद्या मामुडे या युवतींनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

या सर्व मुली महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यांतील आहेत. सर्वजणी शास्त्र शाखेच्या पदव्युत्तर पदवीधारक असून सेट-नेट ची तयारी करत आहेत. त्यासाठी हैदराबाद येथील एका संस्थेत क्लाससाठी त्या गेल्या होत्या. क्लासचा कालावधी संपला असतानाच कोरोना विषाणूमुळे देशभरात टाळेबंदी लागू झाली; आणि या मुली हैदराबाद येथेच अडकून पडल्या. तेव्हापासून गेला दीड महिना त्या महाराष्ट्रात परत येण्यासाठी प्रयत्न करत होत्या. 

एकाच गावात एका ठिकाणाहून दुसरीकडे जाणे शक्य नसताना या मुलींना राज्याची सीमा ओलांडून महाराष्ट्रात आणणे महाकठीण काम होते. अखेर या मुलींनी सुप्रिया सुळे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली आणि आपल्याला महाराष्ट्रात येण्यासाठी मदत करावी, अशी विनंती केली. त्यानुसार सुळे यांनी लागलीच तेलंगणा राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधून याबत माहिती देत दोन्ही राज्यांच्या प्रशासनाशी सातत्याने पाठपुरावा केला आणि काल या मुलींसाठी राज्याची सीमा ओलांडून जाण्यासाठी विशेष परवानगी मिळवली.

दरम्यान, त्यानुसार काल संध्याकाळी या सर्व मुली हैदराबादहून रवाना झाल्या आणि आज राज्यातील आपापल्या घरी पोहोचल्या. घरी पोहोचताच या मुली आणि त्यांच्या कुटुंबीयांनी सुप्रिया सुळे यांचे भरभरून आभार मानले आहेत. सुळे यांच्याबरोबरच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह सोलापूर आणि अन्य जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकरी, युवक राष्ट्रवादीचे पदाधिकारी यांचेही या मुलींनी आभार मानले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT