Pune-Janata-Vasahat 
पुणे

पुणे : जनता वसाहतीत कोरोनाची एन्ट्री; पाच जणांना 'अशी' झाली लागण!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : स्वयंशिस्त आणि जागृकतेने चर्चेत आलेल्या शहरातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या जनता वसाहतीमध्ये अखेर कोरोना विषाणूने प्रवेश केला. त्या वसाहतीमध्ये पाच कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे महापालिका प्रशासनाचे धाबे दणाणले असून त्या ठिकाणी तातडीने उपयोजना सुरू करण्यात आल्या आहेत. 

या वसाहतीतील एका सत्तर वर्षीय वृद्ध विविध आजारांनी ग्रस्त असल्यामुळे त्यांना आठवड्यातून दोनदा डायलिसिससाठी जावे लागत होते. त्या वृद्धाला या विषाणूची बाधा झाली असल्याचे शुक्रवारी (ता.१६) उघडकीस आले. तातडीने त्यांच्या संपर्कात असलेल्या चार जणांची तपासणी करण्यात आली. तर त्यांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. या पाचही जणांना तेथील एका शाळेत क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तर या पाच बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

आतापर्यंत पंधरा जणांचे नमुने घेण्यात आले आहे. त्यांचे रिपोर्ट अद्याप प्राप्त झालेले नाहीत, असे सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी चेतन कबाडे यांनी सांगितले. वसाहतीमध्ये विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तातडीने विविध उपयोजना हाती घेण्यात आल्या आहेत. 

पुणे शहरातही अनेक भागात लहान मोठ्या झोपडपट्टी आहेत, दाटीवाटीने लोक तेथे वास्तव्यास आहेत, अशा अनेक ठिकाणी कोरोनाचा शिरकाव होऊन तो वाढताना दिसत आहे. त्याला फक्त जनता वसाहत अपवाद ठरली होती. शंभर एकर आणि जवळपास 70 हजाराहून लोकसंख्या असणाऱ्या या वसाहतीमध्ये कालपर्यंत कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नव्हता. तेथील रहिवाशांनी दाखविलेली जागरुकता, स्वयंशिस्त आणि या विषाणूंचा आपल्या वस्तीत प्रवेश होऊ नये म्हणून लढाई लढत असलेले तेथील जनता वसाहत कृती समितीचे योद्धे या सर्वांमुळे संपूर्ण शहरात हा चर्चेचा विषय ठरला होता. 

जनता वसाहतीमध्ये हातावर पोट असणाऱ्यांची संख्या जास्त आहे. लॉकडाऊनच्या काळात या नागरिकांची मोठी गैरसोय होत असताना जनता वसाहत कृती समितीने नागरिकांना मदतीचा हात देऊ केला. तसेच वस्तीमध्ये निर्जंतुकीकरण कक्षाची निर्मिती करण्यात आली होती. जीवनावश्‍यक सेवा देणाऱ्या लोकांबरोबरच सर्वांनीच या कक्षातूनच ये-जा करावी, असा नियमच करण्यात आला आहे. तो नियमही तेथील रहिवासी काटेकोरपणे पाळताना दिसत होते. अशा पद्धतीने वसाहत सुरक्षित ठेवण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT