junnar
junnar 
पुणे

जुन्नर पालिकेला कचरा संकलनासाठी पाच नव्या गाड्या

दत्ता म्हसकर

जुन्नर : घन कचरा व्यवस्थापन अंतर्गत केंद्र व राज्य सरकारच्या अनुदानातून कचरा संकलनासाठी पाच नवीन वाहने जुन्नर नगर पालिकेने खरेदी केली आहेत. 

नगराध्यक्ष शाम पांडे, आरोग्य सभापती अंकिता गोसावी, नगरसेवक व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत आज (ता. 29) या वाहनांची नगराध्यक्ष पांडे यांनी पूजा केली. जुन्नर पालिकेच्या स्वच्छता गीतासह, नागरिकांना कचरा वर्गीकरणाच्या सूचना देण्याची सोय नवीन घंटागाड्यात असल्याचे मुख्याधिकारी डॉ. जयश्री काटकर व आरोग्य विभाग प्रमुख प्रशांत खत्री यांनी सांगितले.

आरोग्य विभागा मार्फत जुन्नर शहरातील विविध प्रभागात घरोघरी जाऊन दररोज कचरा संकलन करण्यात येते. या गाड्यांची प्रत्येकी 720 किलो इतकी कचरा संकलन क्षमता आहे. ओला व सुका कचरा संकलनासाठी स्वतंत्र कप्पे गाडीत आहेत.याबरोबर हायड्रोलिकच्या सहाय्याने कचरा खाली करण्याची सोयही असल्याचे त्यांनी सांगितले.

या सर्व घंटागाड्यांवर लाऊडस्पीकरच्या साहाय्याने कचरा वर्गीकरणाच्या सूचनाही देण्यात येणार असून नागरिकांनी घरातच कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण करून घंटागाडीत द्यावा असे आवाहन आरोग्य निरीक्षक खत्री यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT