market.jpg 
पुणे

मार्केट यार्डात शेतमाल आला पण...

प्रवीण डोके

मार्केट यार्ड (पुणे) : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाचा मार्केट यार्डातील भाजीपाला, फळे बाजारात मोठा परिणाम झाला. बाजारात रोजच्या तुलनेत ५० टक्के अवाक झाली. फळे, भाजीपाल्याची आवक कमी झाली असली तरी उठाव नसल्याने भाव स्थिर असल्याची माहिती मार्केट यार्डातील व्यापाऱ्यांनी दिली.

मार्केट यार्डातील बाजारात गुरूवारी ६२ गाड्यांमधून १२४१ क्विंटल भाजीपाला, २० गाड्यांमधून १०२९ क्विंटल फळे तर ४० गाड्यांमधून २१७५ क्विंटल कांदा बटाट्याची आवक आली झाली आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजार सुरू झाल्यापासून भाजीपाला, फळांची आवक कमी आहे. तसेच अनेक ठिकाणी किरकोळ विक्रेत्यांना शेत माल जाग्यावर पोहच मिळत आहे. त्यामुळे बाजारात खरेदीदारांना संख्या कमी आहे.
 

शहरातील महात्मा फुले मंडई, हडपसर मार्केट, लष्कर मधील मंडई यासह उपनगरातील किरकोळ विक्री असणारी काही मार्केट अजून सुरू झाली नाहीत. बाजार सुरू होऊन पाच दिवस झाले आहेत. परंतु ग्राहक अजून हि बाजारात म्हणावा तसा येत नाही. जोपर्यंत ही मार्केट सुरू होणार नाहीत तोपर्यंत ग्राहक वाढणार नाही. तसेच बाहेर गावातील ग्राहक अजूनही बाजारात येत नसल्याचे अडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांनी सांगितले.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुढील काही दिवसात शहरातील किरकोळ मार्केट सुरू होतील. तसेच रविवावर नंतर मार्केट यार्डातील सर्व विभाग हळू हळू पूर्वपदार येतील. तसेच भाजीपाला, फळांची आवक ही वाढणार आहे. सध्या ग्राहकांची वर्दळ नसल्याने अनेक ठिकाणी गाळ्यावर शेत माल शिल्लक राहत आहे. उपनगरातील किरकोळ बाजार सुरू झाले की ग्राहकांची संख्या वाढणार असल्याची माहिती अडते असोसिएशनचे उपाध्यक्ष अमोल घुले यांनी दिली.


कोरोना विषाणूच्या प्रार्दुभावामुळे दीड महिन्यापासून बाजार बंद होता. गेल्या दोन तीन दिवसात सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे बाजारातील शेत मालाच्या आवकेवर काहीसा परिणाम झाला आहे. परंतु वातावरणातील बदल पूर्वपदावर येतील तसे बाजारातील आवक पूर्वपदावर येईल. व्यवहार नियमित सुरू होतील.
- बी. जे. देशमुख, प्रशासक, बाजार समिती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जगात युद्धाची धग, दिल्लीत शांततेचा संदेश; BRICS परिषदेत झाले 'हे' ५ मोठे निर्णय, भारताला काय मिळालं?

Pune Ganeshotsav security: पुण्यात गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ७०१ सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई

IND vs AFG, 1st T20I: बुमराह, सॅमसनचे कमबॅक, पण वैभव सूर्यवंशीला संधी नाही; कशी आहे भारताची Playing XI?

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

Amit Shaha UCC : अमित शहांची मोठी घोषणा ! २०२९ पूर्वी २१ राज्यांत समान नागरी कायदा लागू करणार; घुसखोरांना देशातून हाकलणार

SCROLL FOR NEXT