In 51 percent of the population proved to have antibodies In five corona-affected wards of Pune  
पुणे

पुण्यात हर्ड इम्युनिटी नाही; पण सिरोसर्व्हेत पुणे, दिल्ली-मुंबईच्या पुढे

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरातील अत्याधिक प्रभाव असलेल्या पाच कोरोना बाधित प्रभागांमध्ये 51 टक्के नागरिकांमध्ये अँटिबॉडी असल्याचे सिद्ध झाले. हे प्रमाण दिल्ली आणि मुंबईतील सिरोसर्व्हेच्या (रक्तनामुन्यांची चाचणी) तुलनेत जास्त आहे. या पाच प्रभागांत समूह रोगप्रतिकार शक्ती (हर्ड इम्युनिटी) विकसित झाल्याचे सध्या स्पष्टपणे म्हणता येणार नाही. असे जरी असले तरी अँटिबॉडी असण्याच्या प्रमाणात पुणेकर दिल्ली मुंबईलाही भारी पडले आहे.

मोठी बातमी : 'या' पाच प्रभागांतील निम्म्या पुणेकरांना कोरोनाची लागण; सर्व्हेतून पुढे आली माहिती!

भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (IISER) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (PuneUniversity) शास्त्रज्ञांनी महापालिकेच्या सहकार्याने नुकतेच पाच प्रभागातील नागरिकांच्या रक्त नमुन्यांची चाचणी केली होती. त्यामध्ये 36 टक्यांपासून ते 64 टक्‍क्‍यांपर्यंत विविध प्रभागातील नागरिकांत अँटीबॉडीज असल्याची आकडेवारी समोर आली आहे. असाच सर्व्हे दिल्ली आणि मुंबईत घेण्यात आला. 

- पुणे ठरले भारी : 

नवी दिल्ली येथील सर्व्हेक्षणात 21,000 रक्त नमुन्यांची चाचणी करण्यात आली त्यातील 23.48 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी आढळल्या. तर मुंबई येथील 7,000 रक्त नमुन्यांपैकी 16 टक्के सामान्य लोकांमध्ये, तर 57 टक्के झोपडपट्टीतील नागरिकांमध्ये अँटिबॉडी आढळल्या होत्या. पुण्यातील सर्व्हेत 1,664 रक्त म्हणून नमुन्यांपैकी 51% रक्त नमुन्यामध्ये अँटिबॉडीचे प्रमाण आढळले. 

- हर्ड इम्युनिटी नाही : 

अँटिबॉडी असलेल्या नागरिकांचे प्रमाण 50 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त असले तरी, त्या अँटिबॉडी पुन्हा corona शी लढण्यास सक्षम आहे का नाही, हे आताच सांगता येत नसल्याचे शास्रज्ञ म्हणाले. त्यामुळे लगेच हर्ड इम्युनिटी विकसित झाल्याचे सांगता येणार नाही. त्यासाठी पुढील काही सर्व्हे करण्यात येणार असून त्यामध्ये आयसर आणि विद्यापीठाचाही सहभाग असेल. पुढील दोन सर्व्हेक्षणामध्ये ससून रुग्णालय आणि डी वाय पाटील विद्यापीठ सहभागी असणार आहे. तूर्तास तरी या पांच प्रभागातील अँटिबॉडी असलेल्या नागरिकांची टक्केवारी दिल्ली-मुंबई पेक्षा भारी आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT