Corona-Patient 
पुणे

पुणे जिल्ह्यात ५७२२ नवे कोरोना रुग्ण; ३८ रुग्णांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यात मंगळवारी (ता.२३) दिवसभरात ५ हजार ७२२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरातील एकूण रुग्णांमध्ये शहरातील ३ हजार ९८ रुग्ण आहेत. जिल्ह्यातील दिवसभरातील एकूण रुग्णांची आजची ही  संख्या आतापर्यंतची सर्वाधिक आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूंमध्ये शहरातील २२ रुग्णांचा समावेश आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आज शहरातील सर्वाधिक रुग्णांपाठोपाठ पिंपरी चिंचवडमध्ये १ हजार ५१९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ८११, नगरपालिका क्षेत्र २१६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ७८ रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, दिवसात ३ हजार १२६ कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त रुग्णांमध्ये पुणे शहरातील १ हजार ६९८, पिंपरी चिंचवडमधील ८१२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५२६ , नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी ४५ जण आहेत.

सद्यःस्थितीत जिल्ह्यात ४२ हजार ६५० सक्रिय (ॲक्टिव्ह) रुग्ण आहेत. यापैकी ८ हजार ७६३ रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार चालू आहेत. उर्वरित ३३ हजार ८८७ जणांना गृहविलगीकरण करण्यात आले आहे. विविध रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ३ हजार २, पिंपरी चिंचवडमधील १ हजार ९८०, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २ हजार ७९५ , नगरपालिका हद्दीतील ७५२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील २३४ रुग्ण आहेत.

दिवसभरातील एकूण मृत्यूमध्ये शहरातील सर्वाधिक २२ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील १०, जिल्हा परिषद हद्दीतील तीन, नगरपालिका क्षेत्रातील दोन आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT