plasma-therapy1.jpg 
पुणे

पुणे : "ते' कोरोना विरूध्दची लढाई जिंकले पण... 

सकाळवृत्तसेवा

रामवाडी (पुणे) : वडगावशेरी येथील गणेश नगर भागात एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींनी त्यांच्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर कोरोना विरुद्ध लढाई जिंकली आहे. परंतु आता समाजातील काही व्यक्तींचा त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदला असल्याने या कुटुंबाला मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

कोरोनाच्या लढाईमध्ये 65 वर्षाच्या आजीपासून चार वर्षाच्या नातवाचा समावेश होता. आजीला मणक्‍यात ग्याप आल्याने एका ठिकाणी नस दबल्यामुळे उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले होते. उपचारानंतर चार दिवसांनी त्या घरी परतल्या. आठ दिवसाने पुन्हा तोच त्रास होत असल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

ऑपरेशन करण्यापूर्वी कोरोना टेस्ट करण्यात आली होती. त्यावेळी त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने घरातील दहा व्यक्तींची कोरोना टेस्ट घेण्यात आली. त्यात पाच जणांचे पॉझिटिव्ह तर पाच निगेटिव्ह रिपोर्ट आले होते. त्यांच्या पैकी एका रुग्णांमध्ये कोरोनाची तीव्रता अधिक वाढल्याने अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. 

कोरोनावर योग्य वेळात उपचार घेऊन हे सहाजण कोरोनामुक्त झाले आहे. अत्यावश्‍यक काम असल्यावर आम्ही घराबाहेर पडतो. अशा वेळी परिसरातील काही लोक आमच्या परिचयातील व्यक्तींना फोन करून त्यांना घरी बसायला सांगा असे सांगत आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

जे काही अत्यावश्‍यक गरजा आहे. त्या वेळी आम्ही घराबाहेर पडतो पण काही लोकांचा आमच्या कडे पाहण्याचा दृष्टिकोन पूर्णपणे बदला आहे असे या कुटुंबातील सदस्य सांगत आहेत. 
आम्ही बरे झाल्याचे आमच्या कडे दवाखान्याचे सर्टिफिकेट असून ही अशा माणसांची नकारात्मक मानसिकता आम्ही बदलू शकत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गोकुळ निवडणुकीत मोठा ट्विस्ट! सतेज पाटील थेट भाजप जिल्हाध्यक्षांच्या घरी; नवं समीकरण?

४३ वर्षांनंतर ‘मासूम’ची नवी कहाणी; ए. आर. रहमान यांनी रेकॉर्ड केली 3 गाणी

Ichalkaranji Child Death : दूध पिताना चिमुकल्याला ठसका लागून श्वास कोंडला अन्..., इचलकरंजीमध्ये काळीज पिळवटून टाकणारी घटना

Marathi News Live Updates : नागपूरचे 106 जण अडकले नेपाळमध्ये; सर्वजण सुरक्षित; आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

Nepal Flood : नेपाळ-तिबेट सीमेवर जलप्रलयाचा थरार! महाभयंकर विनाशादरम्यान आतापर्यंत काय-काय घडलं? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT