Bachat_Gat 
पुणे

Positive Story: बचत गटांतील महिलांनी खरेदी केल्या ४३ बस; संरक्षण राज्यमंत्र्यांनी घेतली दखल

मंगेश कोळपकर

पुणे : बचत गटांतील 600 महिलांनी स्वहिश्यातून 43 बस खरेदी करून त्या पीएमपीला भाडेतत्त्वावर देण्याच्या अनोख्या उपक्रमाची दखल संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी घेतली आहे. या बसचे लोकार्पण करण्यासाठी दीपावलीनंतर ते पुण्यात येणार आहेत. 

पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर आणि वाशीम जिल्ह्यांतील 43 बचत गटांतील महिलांनी 44 बस खरेदी केल्या आहेत. त्यासाठी वर्गणी काढून त्यांनी पावणे तीन कोटी रुपये उभारले आहेत. तर, 18 कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. विधवा, माजी सैनिकांच्या पत्नी यांचा बचत गटांत समावेश आहे. सुमारे तीन वर्षे प्रयत्न करून त्यांनी हा उपक्रम राबविला. 

बचत गटांतील महिलांनी माजी सैनिक सुरेश गोडसे आणि कर्नल आर. आर. जाधव यांच्या माध्यमातून विश्वयोद्धा शेतकरी मल्ट्रीट्रेड प्रा. लि. ही कंपनी स्थापन केली आहे. पीएमपीच्या ताफ्यात भाडेतत्त्वावरील 5 कंत्राटदारांच्या सुमारे 500 बस आहेत. त्यात आता या कंपनीच्या 44 बसचाही समावेश झाला आहे. पाचही कंत्राटदारांच्या तुलनेत विश्वयोद्धा कंपनीने स्वस्त म्हणजे 57 रुपये 17 पैसे प्रती किलोमीटर दराने बस पुरविल्या आहेत. 44 पैकी 11 बस पीएमपीच्या मार्गांवर धावू लागल्या आहेत.

कंपनीचे अध्यक्ष गोडसे आणि कर्नल जाधव यांनी दिल्लीला जावून संरक्षण राज्यमंत्री नाईक यांची भेट घेतली. त्यांना या उपक्रमाची माहिती दिली. माजी सैनिकांच्या पत्नी, विधवा असा अनोखा उपक्रम राबवित असल्याचे एेकून त्यांना आनंद झाला. 15 ते 20 नोव्हेंबर दरम्यान स्वतः पुण्यात येवून या उपक्रमाची पाहणी करून उर्वरित 33 बस मार्गांवर येण्यासाठी झेंडा दाखविणार असल्याचे नाईक यांनी सांगितल्याची माहिती गोडसे यांनी दिली. हा उपक्रम राज्यातील अन्य शहरांतही राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

प्रत्येक बसद्वारे प्रत्येक बचत गटाला सुरवातीच्या टप्प्यात दरमहा किमान 40 ते 60 हजार रुपये उत्पन्न मिळेल. ते बचत गटातील महिला वाटून घेणार आहेत. सलग सात वर्षे त्यांना वाढत्या रकमेचे उत्पन्नाचे साधन आता उपलब्ध झाले आहे.

कंपनीने केली भरती 
विश्वयोद्धाकडून पीएमपीला बस चालकासह पुरविण्यात येणार आहे. तसेच देखभाल दुरुस्तीही कंपनीकडून होणार आहे. त्यासाठी कंपनीने सध्या 50 चालकांची आणि 11 मॅकेनिकची भरती केली आहे. पुढच्या टप्प्यात आणखी किमान 50 चालक नियुक्त करण्यात येणार आहेत. कंपनीच्या बस उभ्या करण्यासाठी पीएमपीने त्यांना कात्रज आगाराजवळ जागा उपलब्ध करून दिली आहे. तेथेच कंपनीने सध्या कार्यालय थाटले आहे, अशी माहिती गोडसे यांनी दिली. 

माजी सैनिकांच्या पत्नी, विधवा यांनी बस विकत घेवून त्या भाडेतत्त्वावर परिवहन संस्थेला देण्याचा हा देशातील पहिलाच उपक्रम आहे. त्यामुळे पीएमपीनेही या कंपनीला पूर्ण सहकार्य केले आहे. त्यांना हव्या असलेल्या सुविधाही पुरविण्यात येत आहेत. कंपनीच्या बसला लांबचे मार्ग उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
- राजेंद्र जगताप, अध्यक्ष, पीएमपी

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT