63 year old man did Katraj Sinhagad trek 75 times 
पुणे

63 वर्षांच्या 'तरुणा'ने 75 वेळा केला कात्रज- सिंहगड ट्रेक!

सकाळवृत्तसेवा

पुणे : कात्रज ते सिंहगड ... तब्बल 17 डोंगर पार करून आणि 16 किलोमीटर अंतर कापल्यावर पूर्ण होणारा हा ट्रेक. गिरीभ्रमण ही आवड जोपासणाऱ्या 63 वर्षांच्या एका 'युवकाने' हा ट्रेक तब्बल 75 वेळा पूर्ण करण्याचा पराक्रम नुकताच केला. ट्रेकर्सच्या वर्तुळात कात्रज- सिंहगड या ट्रेकचा राजा अशी उपाधी मिळालेल्या या युवकाचे नाव आहे आप्पा ऊर्फ अनिल सावंत. अमावस्येच्या रात्रीही हा ट्रेक पूर्ण करण्याची त्यांची ख्याती !

 पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे शहराच्या दक्षिणेच्या डोंगर रांगांतील चढ-उताराच्या अवघड, निसरड्या, काही ठिकाणी एकच व्यक्ती जाईल अशा चिंचोळ्या वाटा असलेला कात्रज-सिंहगड म्हणजेच 'केटूएस' एकदा करतानाच भल्याभल्यांची वाट लागते. मात्र, आप्पांनी हाच अवघड आणि तुमच्या तग धरण्याच्या क्षमतेला आव्हान देणारा आप्पांनी 75 वेळी लिलया पार केला आहे. अजून 25 वेळा हा ट्रेक पूर्ण करून 'केटूएस'ची सेंच्युरी पार करायची आहे अप्पांची मनीषा आहे.

टाटा मोटर्समध्ये काम करताना त्यांना पुणे व्हेंचरच्या माध्यमातून गिर्यारोहण आणि पदभ्रमणाची आवड निर्माण झाली. कोविडचे नियम पाळत ट्रेक करायचा असल्याने 27 ऑक्‍टोबरला सकाळी नऊ वाजता कात्रज घाटावरून केटूएस करताना आप्पांनी त्याच्यासोबत अमर, हर्षदा, विपुल, विनय आणि धीरज अशा विशीच्या उमेदीतील फक्त पाच मुलांना सहभागी करुन घेतले. अवघ्या 8 तासांत त्यांनी तो पूर्णही केला. कोणालाही 'केटूएस' करायचा असेल तर, गिरीभ्रमणाच्या वर्तुळात आप्पांना विचारा, असे सांगितले जाते. आप्पांना फोन केला की, सोबत करायला ते तत्पर असतात. या ट्रेकच्या नोंदीही त्यांनी करून ठेवल्या आहेत. आप्पांनी तीन वर्षांपूर्वी तब्बल 79 सहकाऱ्यांसह 'केटूएस'ची 'हाफसेंच्युरी' पूर्ण केली होती. त्यावेळीही त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता.

पाणी प्रदूषण रोखायचंय? तर तुम्हाला पुणे विद्यापीठ देणार ट्रेनिंग 

ट्रेकिंग हे प्रत्येकाने केले पाहिजे, अशी भूमिका असलेले आप्पा हे ट्रेकमध्ये चालत्यालाही पळते करतात. या बाबत ते म्हणतात, 'ट्रेकिंग हा छंद असला तरी त्याच्या माध्यमातून आपली प्रकृती चांगली राहण्यासाठी फार मदत होते. सातत्याने निर्सगाच्या सानिध्यात राहिल्यामुळे श्वसन, रक्तप्रवाह, कोणत्याही प्रकारचे शारिरीक किंवा मानसिक आजार टाळणे सहज शक्‍य होते.'' त्यामुळे प्रत्येकाने गिरीभ्रमण केलेच पाहिजे, असे त्यांना वाटते.

आप्पांची युवा सहकारी हर्षदा कोतवाल म्हणते "आम्हाला सर्वांना लहानपणापासून ट्रेकिंगचं बाळकडू आम्हाला आप्पांनीच दिले. आप्पांसोबत ट्रेकला गेलं  गडावर आणि पायथ्याला झाडं, रानफुलं लावायची, पायांच्या ठशांवरुन जंगली श्वापदं ओळखणं अशा अनेक गोष्टी शिकायला मिळतात. निसर्गाची काळजी घेण्याची त्यांनी सवय लावली. त्यांच्या 75व्या केटूएस ट्रेकला मी त्यांच्यासोबत होते याचा मला खूप आनंद आहे.''

माजी खासदार संजय काकडे यांना पत्नीसह अटक व सुटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मराठ्यांनी ठरवायंच, नेत्याला मोठं करायचं की लेकराबाळांना; जरांगे पाटील रडले

‘गुजरात बांग्लादेशात आहे की पाकिस्तानात?’ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाण बदलावर परेश रावलांचा संताप

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १२ सप्टेंबर २०२६ ते १८ सप्टेंबर २०२६ - मराठी राशी भविष्य

Marathi News Live Updates : मुंबईत महिलांनी अमृताताई आणि लताताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकू लावा : जरांगे पाटील

Satish Jarkiholi ED Raid : ED च्या धाडीत सापडले 2 कोटी! कारवाईनंतर बांधकाममंत्री म्हणाले, 'आमच्या संस्थांची वार्षिक उलाढाल दोन हजार कोटींची..'

SCROLL FOR NEXT