Digital_Banking 
पुणे

डिजिटल बॅंकिंग वापरणाऱ्यांचा टक्का वाढला; कोरोनामुळे झाली मोठी वाढ

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोविड-19 साथीच्या काळात देशामध्ये डिजिटल पेमेंटमध्ये मोठी वाढ झाली आहे. 68 टक्के लोक सध्या आर्थिक व्यवहार करण्यासाठी ऑनलाइन किंवा मोबाईल बॅंकिंगचा वापर करीत आहेत. तर 51 टक्के नागरिक कोविडची साथ संपल्यानंतरदेखील बॅंकिंग आणि पेमेंट करण्याची हीच पद्धत वापरणार आहेत. वित्तीय सेवा तंत्रज्ञानामधील कंपनी 'एफआयएस'च्या नवीन अहवालातून हे निष्कर्ष मांडण्यात आले आहेत.

व्यवहार करण्यात झालेल्या बदलाबाबत 'एफआयएस'ने हा अहवाल केला आहे. देशातील ग्राहक रोख व्यवहार करण्याऐवजी डिजिटल आणि कॉन्टॅक्‍ट-फ्री पेमेंटचा पर्याय निवडू लागले आहेत. 24 ते 39 वर्षे वयोगटातील ग्राहक इतर वयोगटाच्या तुलनेत आर्थिक व्यवहारांचे स्वरूप बदलण्याबाबत अधिक अनुकूल आहेत, असे सर्वेतून समोर आले आहे.

कोरोनाच्या वैयक्तिक आर्थिक स्थैर्यावर झालेल्या परिणाम टक्केवारी :
तीन महिन्यांत वेतन कपातीचा सामना करावा लागला - 49 टक्के
नोकरकपातीला तोंड द्यावे लागले - 20 टक्के
उत्पन्नामध्ये घट करता तग धरता येणार नाही - 49 टक्के

ऑनलाइन पेमेंट संदर्भातील वापरकर्त्यांची मते (टक्केवारीत) :

वय स्पर्श विरहित सुरक्षित व्यवहार सोईस्कर (पैसे व कार्डची आवश्‍यकता नाही) वेळीच बचत
18 ते 23 38 20 27 12
24 ते 28 50 17 20 12
29 ते 39 46 20 23 11
40 ते 54 45 18 24 12
55 पेक्षा जास्त 55 15 24 04

व्यवहाराबाबतच्या नवीन सवयी कायमस्वरूपी रुजणार असून कोरोनानंतरच्या काळात देखील त्या चालू राहतील, असे या सर्वेक्षणातून दिसून आले आहे. ग्राहकांना सेवा देणाऱ्या वित्तीय संस्था आणि व्यापाऱ्यांनी हा कल समजून घेत ग्राहकांच्या बदलत्या गरजा भागविणारे उत्पादने आणि सेवा तयार करणे अत्यावश्‍यक आहे.
- महेश राममूर्ती, व्यवस्थापकीय संचालक, एफआयएस

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited By : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: अहिल्यानगरमध्ये मोठा अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल झाले, ९ वाहनांना धडक दिली अन्...; भीषण घटना

Paralysis Warning Signs : पॅरालिसिसचा झटका येण्याआधी शरीरात दिसतात 'हे' 2 बदल; चुकूनही करू नका दुर्लक्ष, नाहीतर जीव गमवाल

Pooja Khedkar: पुजा खेडकर कुटुंबाचा नवा वाद! नवी मुंबईतील अपहरणकर्ता पुण्यातील घरी आढळला, पोलिसांचा तपास सुरू...

Latest Marathi News Updates: भारत-पाकिस्तान सामन्याच्या निषेधार्थ शिवसेना उद्धव ठाकरे गटचा मोर्चा

Dhule News : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे बोगस डॉक्टरांवर कारवाईचे आदेश

SCROLL FOR NEXT