pune tourism sakal media
पुणे

Pune Tourism | पुणेकरांच्या पर्यटनात चार महिन्यांत ७० टक्के वाढ

हिमाचल प्रदेश, लेह-लडाख, उत्तराखंड आणि ईशान्य भारतासारख्या ठिकाणांना अधिक पसंती मिळत असल्याची बाबही या सर्वेक्षणातून समोर आली आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत पर्यटन क्षेत्र आता ५५ टक्क्यांपर्यंत पोचले आहे. तर जून महिन्यापासून दर महिन्याला पर्यटनात सुमारे ७० टक्के वाढ होत आहे. यात स्थानिक पर्यटनात तब्बल ३०० टक्क्यांची वाढ झाली असून परदेशी पर्यटनाच्या प्रमाणातही ५० टक्के वाढ झाली असल्याचे थॉमस कुक इंडिया संस्थेच्या सर्वेक्षणात आढळले आहे.

संस्थेच्या माइस आणि व्हिसा विभागाचे अध्यक्ष राजीव काळे बुधवारी पत्रकार परिषदेत म्हणाले, ‘‘थॉमस कुक इंडिया’ने कोरोनापूर्व २०१९ मधील सप्टेंबर महिन्यातील स्थिती आणि कोरोना पश्चात २०२१ मधील सप्टेंबर महिन्यातील स्थिती, यांची तुलना करणारे सर्वेक्षण पुण्यात केले. त्यात सहभागी झालेल्या ७७ टक्के व्यक्तींनी याच वर्षात पर्यटन करण्याची इच्छा दर्शवली आहे. तर, ६२ टक्के व्यक्तींनी परदेशी ठिकाणांना पसंती दिली आहे, तर ७८ टक्के व्यक्तींनी स्थानिक पर्यटनाला प्राधान्य दिले आहे.’’

हिमाचल प्रदेश, लेह-लडाख, उत्तराखंड आणि ईशान्य भारतासारख्या ठिकाणांना अधिक पसंती मिळत असल्याची बाबही या सर्वेक्षणातून समोर आली आहे. तर परदेशातील मालदिव, दुबई, स्वित्झर्लंड, फ्रान्स आदी देशांना पसंती मिळते आहे. यातील ५० टक्के पुणेकरांनी कुटुंबासह प्रवास करण्यास तर २० टक्के पुणेकरांनी मित्रमंडळींसह प्रवास करण्याचा पर्याय निवडला आहे. लॉकडाऊनमुळे आलेला थकवा आणि कंटाळा, या वाढत्या मागणीला कारणीभूत ठरत असल्याचे निरीक्षण काळे यांनी या वेळी नोंदवले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Esakal No. 1 Marathi News : मराठी डिजिटलमध्ये eSakal चा दबदबा; कॉमस्कोरमध्ये नंबर 1

Horoscope : उद्या राम नवमीला बनतोय दुर्मिळ योग! पुढचे 6 दिवस 'या' 3 राशीच्या लोकांना हमखास धनलाभ; एका रात्रीत आयुष्यात घडेल मोठी घटना

Latest Marathi News Live Update : आरोग्य केंद्राच्या भोंगळ कारभाराचे वाभाडे; रुग्णवाहिकेतून थेट 'पंचायत समितीत' धडकत अनोखे आंदोलन

Maharashtra Kesari : हर्षवर्धन सदगीरला Sharad Pawar यांच्याकडून १२ लाखांची शिष्यवृत्ती; काका पवारांच्या तालमीला ५० लाख

Ashok Kharat: ‘कर्मकांडां’ची लांबलचक यादी! नाशिकचा भोंदू बाबा इंटरनेटवर ट्रेंडिंग; अशोक खरात केसने गाठली गुगल टॉप सर्च कॅटेगरी

SCROLL FOR NEXT