Hotel 
पुणे

पुणे, पिंपरीतील ७० टक्के हॉटेल बंदच !

सनील गाडेकर

पुणे - ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत परवानगी मिळाल्याने शहरातील अनेक व्यवसाय पुन्हा सुरू झाले. त्यात हॉटेल व्यवसायासाठी सध्या सकारात्मक परिस्थिती आहे. मात्र, ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळेल की नाही, याची भीती व कोरोनामुळे बसलेल्या आर्थिक झटक्‍यातून न सावरल्याने पुणे व पिंपरी-चिंचवडमधील ७० टक्के हॉटेल्स अद्यापही बंदच आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या पाच ऑक्‍टोबरपर्यंत शहरातील सर्व हॉटेल, बार आणि रेस्टॉरंट केवळ पार्सल सेवेपुरती मर्यादित होती. त्यानंतर हॉटेल जेवणास खुली करून एक महिना पूर्ण झाला. या काळात केवळ ३० टक्केच हॉटेल सुरू झाली. त्यातील व्यवसाय हा कोरोनापूर्वीच्या तुलनेत ४० टक्‍क्‍यांपर्यंत आला आहे. औंध, बाणेर, बालेवाडी, हिंजवडी, विमाननगर, मगरपट्टा, खराडी आणि कल्याणीनगर अशा आयटी परिसरातील अनेक हॉटेल्स आजही बंद आहेत. सध्या ५० टक्के क्षमतेने व्यवसाय सुरू करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे अडीच लाखांपैकी ८० ते ९० हजार कर्मचारी कामावर हजर आहेत. हॉटेल पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची परवानगी मिळाल्यास व्यवसायाचे प्रमाण आणि कामगारांची संख्या वाढण्याची शक्‍यता आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील आठ हजार हॉटेल, रेस्टॉरंट आणि बारमधून दरवर्षी ५०० ते ६०० कोटी रुपयांची उलाढाल होते. त्यातील ३० टक्के उलाढाल सुरळीत झाली आहे, अशी माहिती पुणे रेस्टॉरंट ॲण्ड हॉटेलियर्स असोसिएशनने दिली.

हॉटेल का आहेत बंद?

  • ग्राहकांचा अपेक्षित प्रतिसाद न मिळण्याची भीती 
  • लॉकडाउनकाळात झालेले आर्थिक नुकसान 
  • केवळ ५० टक्के व्यवसाय सुरू करण्यास परवानगी 
  • आयटीतील कर्मचाऱ्यांना दिलेले वर्क फॉर्म होम 
  • हॉटेल पुन्हा सुरू करण्यासाठी नसलेले भांडवल  

व्यावसायिकांच्या मागण्या

  • रात्री दीडपर्यंत हॉटेल्स सुरू करण्यास 
  • परवानगी द्यावी
  • कामकाजाची क्षमता ७५ टक्‍क्‍यांपर्यंत वाढवावी

ग्राहकांचा प्रतिसाद आणि व्यवसायातील उलाढाल हळूहळू वाढत आहे. मात्र, आजही ७० टक्के हॉटेल्स बंद आहेत. रात्री नऊनंतर गर्दी कमी होते. ५० टक्के क्षमतेने व्यवसाय सुरू असल्याने ३० ते ४० टक्केच कामगार ठेवले आहेत. त्यामुळे अनेकांचा रोजगार थांबला आहे. कामकाजाच्या क्षमतेचे प्रमाण आणि हॉटेलच्या वेळा वाढविणे गरजेचे आहे.  
- गणेश शेट्टी, अध्यक्ष, पुणे रेस्टॉरंट ॲण्ड हॉटेलियर्स असोसिएशन

गेल्या काही दिवसांपासून ग्राहकांचा प्रतिसाद वाढत आहे. मात्र, अजूनही व्यवसाय पूर्वीसारखा नाही. नागरिकांच्या मनात कोरोनासारखी भीती आहे. मात्र, ग्राहक आणि व्यावसायिकही सर्वच योग्य काळजी घेत आहेत. दिवाळीनंतर परिस्थिती सुधारेल, अशी आशा आहे.
- राजेश गोस्वामी, हॉटेल व्यावसायिक

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin: लाडक्या बहिणींसाठी २०० कोटींची तरतूद; राज्यात १० मॉल उभे करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

US Birth Tourism: गर्भधारणेदरम्यान अमेरिकेत प्रवास करणाऱ्यांसाठी धोक्याची घंटा! यूएस दूतावासाकडून व्हिसा रद्द करण्याचा इशारा, कारण काय?

Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणात १९ तारखेला दोषारोप निश्चिती? सुनावणीत नेमकं काय घडलं?

Pune News : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात ३ हजार कोटींचा विकासधडाका; सोमवारी मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम!

Latest Marathi News Live Update : बीडमध्ये पुन्हा बिबट्या दिसला

SCROLL FOR NEXT