Vaccination Sakal
पुणे

लसीकरणासाठी अवघ्या ९० सेकंदांत ७०० जणांची नोंदणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे - लसीकरणासाठी १८ ते ४४ वयोगटातील नागरिक उत्सुक असताना शहरात केवळ दोन ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहेत. त्याची क्षमता प्रत्येकी ३५० आहे. ऑनलाइन केंद्र निवडण्यासाठी लिंक उपलब्ध होताच अवघ्या ९० सेकंदांत ७०० जणांची नोंदणी होत आहे. त्यानंतर दोन्ही केंद्र लसीकरणासाठी उपलब्ध नसल्याची सूचना ॲपवर दिली जात आहे.

राज्य शासनाकडून लस उपलब्ध न झाल्याने शनिवारपासून ४५ ते पुढील वयोगटातील लसीकरण ठप्प आहे. सोमवारी सायंकाळ पर्यंतही लस उपलब्ध झालेली नसल्याने मंगळवारीदेखील लसीकरण केंद्रांना टाळे असणार आहे. शहरात सध्या १८ ते ४४ वयोगटासाठी मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय आणि येरवडा येथील राजीव गांधी रुग्णालयात लसीकरण सुरू आहे. तेथे १ ते ७ मे या दिवसांसाठी ५ हजार डोस महापालिकेकडे उपलब्ध झाले आहेत.

शासनाच्या आदेशानुसार या दोन्ही केंद्रांवर प्रत्येक दिवशी जास्तीत जास्त ३५० जणांनाच लस देता येणार आहे. १८ ते ४४ वयोगटासाठी ज्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे, अशांनाच ठरवून दिलेल्या वेळेत लस दिली जात आहे. त्यासाठी कोविन, आरोग्य सेतू, उमंग या ॲपवरून नोंदणी करता येत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून नागरिक अपॉइंटमेंटसाठी प्रयत्न करत असताना त्यांना आजचा कोटा पूर्ण झाला आहे, त्यामुळे लसीकरण केंद्र उपलब्ध नाही असा मेसेज येत आहे.

प्रत्येक केंद्रावरील ३५० डोसची नोंदणी एक दिवस आधी करून घेतली जात आहे. पालिकेने सोमवारी (ता. ३) दुपारी तीन वाजता ॲपवर बुकिंगची सुविधा उपलब्ध करून दिली. त्यानंतर अवघ्या दीड मिनिटात कमला नेहरू आणि राजीव गांधी रुग्णालयातील लसीकरण केंद्रांवरील नोंदणी फुल्ल दाखविण्यात आली. एवढ्या प्रचंड प्रमाणात पुण्यातील नागरिक नोंदणीसाठी तयार होऊन बसले आहेत. सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. वैशाली जाधव म्हणाल्या, ‘‘१८ ते ४४ वयोगटासाठी एक दिवस आधी बुकिंग करून घेतले जाते. ती लिंक दुपारी ३ वाजता उघडली जाते. यामध्ये नागरिकांनी कमला नेहरू आणि राजीव गांधी रुग्णालय केंद्र निवडावे. पण ऑनलाइन बुकिंग लगेच संपत असल्याने अनेक जण प्रतीक्षेत आहेत.

चुकीच्या केंद्राची निवड

ऑनलाइन बुकिंग करताना त्यात पुणे शहर, जिल्हा व पिंपरी-चिंचवड येथील लसीकरण केंद्रांची माहिती दिसते. अनेकदा नागरिक गडबडीत घरापासून लांबचे केंद्र निवडतात. त्यामुळे ३५० लशींचे बुकिंग झाले, तरी त्यापेक्षा कमी लसीकरण होत आहे. चुकीचे केंद्र निवडल्याने त्याचा फटका इतर नागरिकांना बसत आहे. त्यामुळे ऑनलाइन बुकिंग करताना शहरातील नागरिकांनी कमला नेहरू रुग्णालयासाठी ४११०११ आणि राजीव गांधी रुग्णालयासाठी ४११००६ हा पिनकोड निवडावा, तसेच जिल्ह्यातील व पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांनी त्यांच्या जवळच्या केंद्राचा पिनकोड टाकावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar On Narendra Modi : मोदींनी ७५ व्या वर्षी राजकारणातून निवृत्त व्हावं का? शरद पवारांनी एका वाक्यात सांगितलं, देवाभाऊंवरी टीका

Gadchiroli News: दोन महिला माओवाद्यांना कंठस्नान; गडचिरोली जिल्ह्यातील मोडस्के जंगल परिसरात चकमक

Google Gemini AI Photo Prompt: तेच ते प्रॉम्प्ट वापरून कंटाळला आहात? सुंदर फोटोसाठी स्वत:च बनवा 'असे' क्रिएटिव्ह प्रॉम्प्ट

Gold Rate Today : सोन्यात घसरण सुरुच,चांदीही झाली स्वस्त; जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा ताजा भाव

Teacher Recruitment : 'राज्यात सरकारी-अनुदानित शाळांमध्ये तब्बल 18,500 नवीन शिक्षकांची भरती करणार'; शिक्षणमंत्र्यांची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT