700 students studying for the finally got home Due to the efforts of the police.jpg 
पुणे

Video : पुण्यात अडकेले 700 विद्यार्थी पोलिसांच्या प्रयत्नामुळे अखेर परतले स्वगृही 

सकाळवृत्तसेवा

पुणे : शहरात संचार मनाई आदेश लागू झाल्यापासून स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी पुण्यात अडकून पडले होते. या विद्यार्थ्यांना घरी परतण्याचे वेध लागले होते. परंतु लॉकडाऊनमुळे त्यांना घरी जाता येत नव्हते. पुणे पोलिसांनी शहरात अडकलेल्या सातशे विद्यार्थ्यांना सहा दिवसांमध्ये तीस खासगी बसद्वारे त्यांच्या घरी पाठविले. 

राज्याच्या कानाकोपऱ्यातुन हजारो तरुण-तरुणी शिक्षण घेण्यासाठी पुण्यात येतात. कोरोनामुळे शहरात संचार मनाई आदेश लागू झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ लागली होती. राहणे, खाणे-पिणे, अभ्यासिका अशा सगळ्याच बाबतीत विद्यार्थ्यांना अडचण येत होती. तरीही मागील 50 दिवस हे विद्यार्थी शहरात राहात होते. पोलिस ठाणे, विविध सामाजिक संघटना, राजकीय व्यक्तींकडून विद्यार्थ्यांना जेवण पुरविले जात होते. मात्र राज्याअंतर्गत व परराज्यातील नागरीकांना घरी जाण्यास सरकारकडून "ग्रीन सिग्नल' प्राप्त झाल्यानंतर या विद्यार्थ्यांच्या घरी जाण्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या होत्या. 

- पुणे : जनता वसाहतीत कोरोनाची एन्ट्री; पाच जणांना 'अशी' झाली लागण!

दरम्यान, पोलिस आयुक्त डॉ.के.वेंकटेशम यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरीक्त पोलिस आयुक्त अशोक मोराळे, गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त बच्चन सिंग, सहाय्यक पोलिस आयुक्त विजय चौधरी यांनी या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पावले उचलण्यास सुरूवात केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी विद्यार्थ्यांशी समन्वय साधण्यास सुरूवात केली. त्यानुसार 11 मे पासून आत्तापर्यंत 700 विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना 30 खासगी बसद्वारे त्यांना गावी पाठविण्यात आले. नांदेड, लातूर, सातारा, अहमदनगर, बीड, बुलढाणार, चंद्रपुर, अकोला, उस्मानाबाद, नागपुर या जिल्ह्यांमध्ये विद्यार्थी-विद्यार्थीनींना पाठविण्यात आले आहे. पोलिसांकडून विद्यार्थ्यांना माफक दरात बससेवा व प्रवासाचा परवाना उपलब्ध करुन देण्यात आला. 

विद्यार्थी-विद्यार्थीनींना त्यांच्या वसतिगृहापासून ते बसस्थानकापर्यंत बसने आणणे, तेथून त्यांच्या गावी जाण्यासाठी खासगी बसमध्ये व्यवस्था करणे, विद्यार्थ्यांना चहा, नाश्‍ता व जेवण तसेच सुरक्षिततेसाठी स्वारगेट पोलीस ठाण्याच्या मदतीने वैद्यकीय तपासणी करण्याबरोबरच त्यांना मास्क, सॅनिटायझर, हॅंडग्लोज देण्यात आले. त येते व त्यांना मास्क पुरवणे हे काम अर्थातच पार पडले आहे. 

आणखी वाचा - पुण्यात सरकारी कार्यालये सुरू होण्याचे संकेत

"पोलिसांनी आमची दखल घेत आमची जाण्याची व्यवस्था केली. पोलिसांसमवेत सामाजिक संस्थांनी आम्हाला मदत केल्यामुळे आमचा घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. उरलेल्या विद्यार्थ्यांनाही अशीच मदत करावी.''
- विकास नरवडे, विद्यार्थी. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

"मी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारी विद्यार्थीनी आहे. लॉकडाऊनमुळे आमच्यासारखे हजारो विद्यार्थ्यांना घर जाता येत नव्हते. पोलिसांनी आमची बसची व्यवस्था केली. जेवण, पाणी, वैद्यकीय तपासणी करुन आम्हाला सहकार्य केले. घरी जाण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.''
- विद्यार्थीनी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cigarette Price: सिगारेट ओढणाऱ्यांना मोठा झटका! १८ रुपयांची सिगारेट थेट ७२ रुपयांवर पोहोचणार? नेटकरी म्हणाले- आता सर्व...

Gold Rate Today : सोन्याचा नवा उच्चांक ! आठवड्यात ७ हजार रुपयांनी महागले, चांदीतही ३७००० ची वाढ; जाणून घ्या आजचा ताजा भाव

नोरा फतेही पुन्हा प्रेमात? फुटबॉलपटूला डेटिंग करत असल्याची अफवा, दुबई आणि मोरोक्कोमध्ये गाठीभेटी सुरु

PCMC Election : पिंपरीतील तीन जागांवर युती काढणार तोडगा; नेत्यांकडून बैठकांचा सपाटा

U19 IND vs SA: १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला टीम इंडियाचा कर्णधार; द. आफ्रिकेत नेतृत्व करताना घडवणार इतिहास

SCROLL FOR NEXT