ghorpadi1.jpg
ghorpadi1.jpg 
पुणे

पुण्यातील ७५ वर्षीय माजी लष्करी अधिकाऱ्याने कोरोनाला हरविले

सकाळवृत्तसेवा

घोरपडी (पुणे): बी. टी. कवडे रस्ता येथे राहणाऱ्या एका ७५ वर्षीय माजी लष्करी अधिकाऱ्याने कोरोनाला हरवले आहे. ९ मे रोजी ताप व इतर काही त्रास होत असल्यामुळे त्यांना कमांड हॉस्पिटल मध्ये नेले असताना त्यांची कोरोना चाचणी केली. १० तारखेला कोरोना चाचणी सकारात्मक आली तसेच न्यूमोनिया झाल्यामुळे हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. अखेर  कोरोनावर मात करत आज ते दहा दिवसांनी घरी आले आहेत.

घरी आल्यावर त्यांचे टाळ्या वाजवून तसेच दिवे लावून सोसायटीच्या व्यवस्थापन सदस्यांनी जंगी स्वागत केले. याचे नियोजन सोसायटीच्या अध्यक्षा रुपाली कवडे व इतर सदस्यांनी केले होते. लष्करात मराठा बटालियन मध्ये ले. कर्नल पदावर त्यांनी २२ वर्ष देश सेवा केली आहे.

निवृत्ती घेतल्यानंतर गेल्या १५ वर्षांपासून ते बी. टी.कवडे रस्त्यावर राहतात. लष्करी शिस्त अंगी  असल्यामुळे कर्नल स्वतः लॉकडाउनच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करत होते. परंतु तरीही अचानक कोरोना झाल्यामुळे कुटुंबातील सर्वजण चिंतेत होते.

पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा

घरातील इतर पाच लोकांची चाचणी केली. दुसऱ्या दिवशी सर्वांची चाचणी नकारात्मक आल्याने त्यांच्या कुटुंबीयांना दिलासा मिळाला. या लष्करी अधिकाऱ्याने इच्छाशक्ती आणि योग्य वैद्यकीय उपचार यामुळे कोरोनाची लढाई यशस्वीरित्या पार पाडली. सीमेवरची लढाई असो किंवा कोरोनाची त्यांनी या वयात सहजरित्या मात केल्याने त्यांचे परिसरात कौतुक केले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident Viral Video : कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन आरोपीचे शिवीगाळ करणारे रॅप साँग व्हायरल?

Swati Maliwal Rajya Sabha Membership: '...काहीही झालं तरी मी माझं पद', स्वाती मालीवाल यांनी राज्यसभेच्या राजीनाम्याबाबत केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update : आरोपी विशाल अग्रवालच्या नातेवाईकांकडून पत्रकारांना शिवीगाळ, दमदाटी

Nashik News : सिन्नरमध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोघांचा कुंदेवाडी बंधाऱ्यात बुडून मृत्यू; कुटुंबियांवर शोककळा

Dombivli MIDC Blast : डोंबिवलीतील अतिधोकादायक रासायनिक कंपन्यांचे कायमस्वरूपी स्थलांतर करणार; स्फोटानंतर खासदार शिंदेंची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT