Gutkha-Seized 
पुणे

पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर ७६ लाखाचा गुटखा जप्त

प्रा. प्रशांत चवरे

भिगवण - पुणे सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भादलवाडी (ता. इंदापुर) येथे सोलापुरहुन पुण्याकडे प्रतिबंधित गुटखा घेऊन जाणाऱा कंटेरनर भिगवण पोलिसांनी पकडुन वाहनासह ७६ लाख २४ हजार सातशे साठ रुपयांचा गुटखा पान मसाला जप्त केला आहे. भिगवण पोलिस ठाण्याच्या वतीने आत्तापर्यंतची ही सर्वात मोठी कामगिरी केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याप्रकरणी वाहन चालक करमहुसेन हसनराजा चौधरी(वय.३३ रा. मुडीला, ता.मेहदावल, जि. संत कबीरनगर उत्तरप्रदेश) शहजाद तुफेल खान, शादाब तुफेल खान(रा. कोंढवा पुणे), अज्ञात मालपुरवठादार व गुटखा उत्पादन कंपनी यांचेविरुध्द भादवि अन्न सुरक्षा अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन वाहन चालक करम हुसेन पिता हसन राजा चौधरी यांना अटक करण्यात आली आहे.

याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेली माहीती अशी - पुणे सोलापुर रा्ष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी(ता.०३) दुपारी भिगवण पोलिस ठाण्यातील पोलिस नाईक इन्कलाब पठाण हे गस्त घालत असताना भादलवाडी (ता.इंदापुर) येथील हॉटेल श्री व्हेज समोरुन एक कंटनेर(क्र. के.ए.२२ डी. २२७४) हा सोलापुर बाजुकडुन पुणे बाजुकडे निघाला होता. कंटेनरबाबत संशय आल्यामुळे पोलिसांनी पाठलाग करुन कंटेनर थांबवुन तपासणी केली असता कंटेनरमध्ये ४५ लाख ५३ हजार सातशे साठ रुपयांचा हिरा पान मसाला,१० लाख ७१ हजार रुपयांचा रॉयल पान मसाला आढळुन आला. पोलिसांनी पान मसाला ५६ लाख २४ हजार सातशे साठ रुपयांचा गुठखा व २० लाख रुपयांचा कंटेनर असा एकुण ७६ लाख २४ हजार सातशे साठ रुपयांचा माल जप्त केला.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक संदीप पाटील, बारामती अप्पर पोलिस अधिक्षक प्रदीप मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक जीवन माने, पोलिस निरीक्षक रियाज शेख पोलिस नाईक इन्कलाब पठाण व भिगवण पोलिसांनी केली. 

भिगवण पोलिसांची सर्वात मोठी कारवाई -
पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावरुन सोलापुर बाजुकडुन पुण्याकडे किंवा कोल्हापुर बाजुकडुन अहमदनगरकडे प्रतिबंधित गुटखा पान मसाल्याची मोठी वाहतुक होते. अनेकदा भिगवण पोलिसांकडुन गुटखा पान मसाला पकडण्यात आला होता. परंतु गुरुवारी (ता. ०३) भिगवण पोलिसांनी ७६ लाख २४ हजार सातशे साठ रुपयांचा गुटखा पान मसाला जप्त करत मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे अवैध प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांचे कंबरडे मोडणार आहे. भिगवण पोलिसांनी केलेल्या या मोठ्या कारवाईबद्दल पोलिस दलातील वरिष्ठांसह नागरिकांकडुनही भिगवण पोलिसांचे कौतुक होत आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: एका षटकाने इंग्लंडचा आत्मविश्वास वाढला! आपलाच गोलंदाज भारताचा वैरी ठरला; स्मिथपाठोपाठ हॅरी ब्रूकचे शतक

'राणादा' वारकऱ्यांसोबत दंग, स्वत: हाताने केलं अन्नदान, हार्दिक जोशीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

Latest Maharashtra News Updates : - जाहीर केलेले ११६० कोटी देऊन शाळांना टप्पा वाढ द्यावी

Uddhav Thackeray Video: उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ व्हायरल; 'जय गुजरात'चा दिला होता नारा

Sushil Kedia Tweet: देवेंद्रजी आणि अमितजी मला वाचवा! माझ्याविरोधात मोठी मोहीम...; सुशील केडियांची संरक्षणासाठी धाव

SCROLL FOR NEXT