Corona_Positive 
पुणे

Corona Updates : पुणे जिल्ह्यात बुधवारी आढळले ७७२ नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात बुधवारी (ता.4) दिवसभरात 772 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील 328 जणांचा समावेश आहे. बुधवारी 7 हजार 546 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या चोवीस तासांत 729 जण कोरोनामुक्त झाले आहेत. याशिवाय 30 जणांचा मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता 3 लाख 25 हजार 984 झाली
आहे. कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या ही 3 लाख सहा हजार 674 झाली
आहे. दरम्यान, आतापर्यंत 7 हजार 985 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 372 रुग्णांचा समावेश आहे.

बुधवारी पिंपरी चिंचवडमध्ये162, जिल्हा परिषद क्षेत्रात 181, नगरपालिका क्षेत्रात 82 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 19 नवे रुग्ण सापडले आहेत. दिवसभरात मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक 18 जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील 4, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 5 आणि नगरपालिका कार्यक्षेत्रातील 2 आणि कॅंटोन्मेंट क्षेत्रातील एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही मंगळवारी (ता.3) रात्री 9 वाजल्यापासून बुधवारी (ता.4) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 14 लाख 42 हजार 607 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यापैकी पुणे शहरातील 7 लाख 46 हजार 21 चाचण्यांचा समावेश आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 4 लाख 11 हजार 914, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 2 लाख 3 हजार 464, नगरपालिका क्षेत्रात 62 हजार 975 आणि कॅंटोन्मेंट क्षेत्रात 18 हजार 233 कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray On Gyanesh Kumar : ‘ज्ञानेशाकडून सत्तेतले रेडे आपले वेद वदवतायत’; राज ठाकरेंचा ज्ञानेश कुमारांवर पुन्हा निशाणा

Pune Ganpati Visarjan Live Tracking: गणपती विसर्जन मिरवणूक Live; कोणतं मंडळ कुठे पोहोचलं? एका क्लिकवर पाहा लाईव्ह लोकेशन अन् ट्रॅफिक अपडेट्स

Gold Rate Today: अनंत चतुर्दशीला सोनं 11 हजारांनी स्वस्त; मुंबई-कोल्हापूरसह महाराष्ट्रभरात ताजा भाव पाहा

Maharashtra Ganesh Visarjan Live: पुण्यातील मानाच्या गणपतींच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात Live पाहा, ढोलताशांच्या गजरात भक्तांचा उत्साह शिगेला

Ray-Ban Glasses: मार्क झुकरबर्गने लाँच केले कॅमेरा नसलेले नवे स्मार्ट ग्लासेस; Muse AI एजंटसह 'म्युझ चार्म' डिव्हाइस बाजारात...

SCROLL FOR NEXT