79 thousand lakh jewelry found were returned to the original owner 
पुणे

प्रामाणिकपणाच! सापडलेले पाऊण लाखांचे दागिने मुळ मालकाला केले परत 

विजय मोरे

उंडवडी(पुणे) : आजच्या जगात प्रामाणिकपणा या गोष्टी विरळ होत असताना अजूनही जगात प्रामाणिक लोक आहेत. याची प्रचिती उंडवडी कडेपठार येथील शेतकरी संतोष जराड यांच्या रुपाने बुधवारी (ता. 28) रात्री आली. त्याला निमित्त होते. रस्त्यावर सापडलेली पाऊण लाख रुपये किमंतीची सोन्याची कर्ण फुले असलेली पिशवी. संतोष जराड यांनी प्रामाणिकपणे ही पिशवी दागिण्यांसह मूळ मालकाला परत केली. त्यामुळे जराड यांचा समाजात एक वेगळा आदर्श निर्माण झाला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे
 ► क्लिक करा

खराडेवाडी येथील शेतकरी नामदेव तुकाराम भापकर हे बुधवारी(ता. 28) ते त्यांच्या पत्नीला सोन्याची कर्ण फुले आणण्यासाठी बारामतीला गेले होते. कर्ण फुले घेवून ते सायंकाळी सहाच्या दरम्यान दुचाकीवरुन  बारामती- पाटस रस्त्याने घराकडे परतत असताना उंडवडी कडेपठारच्या हद्दीत आल्यानंतर रस्त्यावरील एका खड्यात त्यांची दुचाकी आदळली. त्यांच्या दुचाकीच्या डिगीतील छोटीशी पिशवी खड्यात पडली. या पिशवीत 79 हजार रुपये किमंतीचा दागिना होता. यावेळी उंडवडी कडेपठार येथील शेतकरी संतोष जयसिंग जराड यांना ती पिशवी सापडली. पिशवीत सोन्याची दीड तोळे असलेली दोन सोन्याची कर्ण फुले व खरेदीचे बिल होते. खरेदी बिलावर नाव, पत्ता आणि मोबाईल नंबर देखील होता. 

अखेर पुणे विद्यापीठाचं ठरलं; बॅकलॉगची परीक्षाही होणार ऑनलाइन!

संतोष जराड यांनी लगेच, त्या बिलावरील मोबाईलवरुन भापकर यांना फोन करुन पिशवी सापडल्याची कल्पना दिली. तो पर्यंत भापकर आणि त्यांची पत्नी पिशवी हरविल्यामुळे हतबल झाले होते. जराड यांनी घरी बोलावून भापकर पती- पत्नीकडे सापडलेली दागिन्याची पिशवी मोठ्या आनंदाने परत केली. यावेळी भापकर दापंत्याच्या डोळ्यात आनंद अश्रू अनावर झाले. संतोष जराड यांनी दाखवलेल्या  प्रामाणिकपणाचे परिसरात कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT