Khadakwasla_Dam 
पुणे

पुणेकरांनो, खडकवासला धरणसाखळीत उरलाय अडीच महिने पुरेल इतका पाणीसाठा!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : जुलैच्या मध्याला पावसाने ओढ दिल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळीत सध्या जेमतेम साडेआठ अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आहे. केवळ पुणे शहरासाठी हा साठा चार ते पाच महिने जाईल. परंतु शहरासोबतच काही ग्रामपंचायती आणि संस्थांना पाणीपुरवठा केल्यास तो सप्टेंबरअखेरपर्यंत पुरेल, अशी माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाने दिली. 

यंदा जून महिन्यात मॉन्सूनचे वेळेवर आगमन झाले. परंतु त्यानंतर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाला. त्यामुळे धरणांतील पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. 

गेल्या जून महिन्याच्या मध्यास पावसाळा सुरू झाल्यानंतर खडकवासला प्रकल्पात सुमारे सहा टीएमसी पाणीसाठा होता. एक महिन्यानंतर म्हणजे 15 जुलैला या प्रकल्पातील खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चार धरणांत सध्या एकूण 8.56 टीएमसी (29.39 टक्के) पाणीसाठा आहे. गतवर्षी याच तारखेला 13.55 टीएमसी (46.48 टक्के) पाणीसाठा होता. 

खडकवासला प्रकल्प सद्यस्थिती : 
(धरण, पाणीसाठा टीएमसीमध्ये आणि कंसात टक्केवारी) : 
खडकवासला : 0.90  (72) 
पानशेत : 3.78  (35.54)
वरसगाव : 3.34  (26.04)
टेमघर : 0.54  (14.60)

पुणे महापालिका खडकवासला धरणातून दररोज सुमारे 1400 'एमएलडी' पाणी उचलत आहे. खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा पाहता शहराला सप्टेंबर अखेरपर्यंत अडचण येणार नाही. खरीप हंगामासाठी पावसाळी आवर्तन सुरू केलेले नाही. परंतु उपलब्ध पाणीसाठ्यातून प्रकल्पावर अवलंबून असलेल्या काही ग्रामपंचायती आणि संस्थांनाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून द्यावे लागेल.
- विजय पाटील, कार्यकारी अभियंता, खडकवासला पाटबंधारे विभाग.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diwali Traffic: पुणे-नाशिक महामार्गावर रांगा ;दिवाळीसाठी गावाकडे धाव ; हिवरगाव पावसा टोलनाक्यावरील स्थिती

IAS बनण्याचं स्वप्न भंगलं, KBCमध्येही अपयश; अखेर शॉर्टकट म्हणून गुन्हेगारीचा मार्ग निवडला, बीटेक पदवीधर तरुणाला अटक

Chh.Sambhajinagar Crime News: पत्नीच्या छेडछाडीचा बदला घेण्यासाठी कंत्राटदाराचा काटा काढला? इंद्रजित खुळे हत्या प्रकरणात दोघे उत्तर प्रदेशातून अटकेत

Latest Marathi News Live Update: इंधनाची गुणवत्ता आणि वापराबाबतच्या तक्रारींची सविस्तर चौकशी सुरू- मुख्यमंत्री डी. के शिवकुमार

Indian Air Force : तेरा हजार फुटांवरील धावपट्टीवर ‘आयएल-७६’ हवाई दलाची ऐतिहासिक कामगिरी; चीनबरोबरील ‘एलएसी’जवळ लँडिंग

SCROLL FOR NEXT