Corona-patient 
पुणे

पुणे जिल्ह्यात आज ८३० नवे रुग्ण; १० रुग्णांचा मृत्यू

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यात रवाना (ता.२९ ) दिवसभरात ८३०  नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. एकूण रुग्णांत शहरातील ४०० रुग्ण आहेत. आज दिवसभरात ८  हजार ८२  कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या २४  तासांत १० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

याशिवाय ६२२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील आठ दिवसांपासुन रोज दिवसभरातील नवीन रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त रुग्णांचे प्रमाण कमीच होत आहे. आजही हे प्रमाण कमीच आहे. दिवसभरातील एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील तीन, पिंपरी चिंचवडमधील चार आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील तीन जण आहेत. नगरपालिका आणि कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही.

जिल्ह्यात सध्या विविध रुग्णालयात ४ हजार ४५७ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच ७ हजार २१० रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. यामुळे पुणे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख ४२ हजार ३७० झाली आहे. यापैकी आतापर्यंत  ३ लाख २२  हजार ४७७ कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ८ हजार ३९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 403 रुग्ण आहेत.

आज पिंपरी चिंचवडमध्ये १९२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १७०, नगरपालिका क्षेत्रात  ५७ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ११ नवे रुग्ण सापडले आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही काल (ता.२८) रात्री आठ वाजल्यापासून आज (ता. २९) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एक पेन ड्राइव्ह तपासायला किती वेळ लागतो? २४ तासांत अहवाल द्या, हायकोर्टानं राज्य सरकारला फटकारलं

Udgir Crime : जेवणाच्या बहाण्याने घरात घुसून महिलेवर अत्याचार; आरोपीविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

युद्धामुळे महागाईचा भडका, सरकारने एक कोटीची नोट छापली, पण बाजारात पिशवीही भरणार नाही; इराणची अर्थव्यवस्था संकटात

विजय वडेट्टीवार यांच्यावर शंभर कोटींच्या मानहानीचा दावा; कुणी दाखल केली याचिका? नेमकं प्रकरण काय?

SRH Viral Video: सिलेक्टर्स ऐकतायेत, जरा सांभाळून... इशान किशनची सर्वांसमोर नितीश रेड्डीला वॉर्निंग; अभिषेक शर्मालाही लागला हसू

SCROLL FOR NEXT