पुणे

"म्हाडा'च्या सदनिकांसाठी उच्चांकी 97 हजार 344 अर्ज; अनामत रक्‍कम भरण्यासाठी आज शेवटचा दिवस 

सकाळवृत्तसेवा

पुणे - गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) पुणे विभागातील पाच हजार 647 सदनिकांसाठी नोंदणीच्या शेवटच्या दिवशी सोमवारपर्यंत तब्बल 97 हजार 344 अर्ज प्राप्त झाले आहेत. पुणे म्हाडाच्या इतिहासात पहिल्यांदाच उच्चांकी प्रतिसाद मिळाला आहे. त्यापैकी 70 हजार 633 नागरिकांनी अनामत रक्‍कम भरली आहे. उर्वरित अर्जदारांना अनामत रक्‍कम भरण्यासाठी मंगळवार (ता. 12) शेवटचा दिवस असून, रात्री 12 वाजेपर्यंत ही रक्‍कम भरता येणार आहे. 

"म्हाडा'च्या पुणे विभागाचे मुख्य अधिकारी नितीन माने यांनी ही माहिती दिली. पुणे, कोल्हापूर, सोलापूर आणि सांगली जिल्ह्यातील म्हाडाच्या सदनिकांसाठी अर्ज भरण्याची मुदत सोमवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत होती. सदनिकांसाठी प्राप्त अर्जावरून मागणीचे प्रमाण उपलब्ध सदनिकांच्या तुलनेत 20 पट इतके आहे. अनामत भरण्याच्या शेवटच्या दिवशी बहुतांश नागरिक रक्‍कम जमा करतील. म्हाडाच्या मागील ऑनलाइन सोडतीसाठी 32 हजार अर्ज आले होते. या वेळी गतवर्षीच्या तुलनेत तिपटीने प्रतिसाद मिळाला, असे माने यांनी सांगितले. 

एजंट खुनी हल्ल्याचा कट उघडकीस; कुविख्यात गुन्हेगाराला दिली होती १० लाखांची सुपारी​

म्हाडाच्या सदनिकांसाठी 22 जानेवारीला ऑनलाइन सोडत काढण्यात येणार आहे. कॅम्प परिसरातील नेहरू मेमोरिअल हॉलमध्ये सकाळी 10.10 वाजता ही सोडत काढणार आहे. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, राज्यमंत्री सतेज पाटील यांच्यासह अन्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत. 

नागरिकांची घरांची मागणी वाढली आहे. सध्या कोरोनाचा काळ असूनही म्हाडाच्या सदनिकांसाठी नागरिकांचा अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद मिळाला. नागरिकांची म्हाडावरील विश्‍वासार्हता हे त्याचेच द्योतक आहे. 
- नितीन माने,  मुख्य अधिकारी, म्हाडा, पुणे विभाग 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipith Highway villages list : शक्तिपीठ महामार्ग जाणाऱ्या गावांची यादी आली समोर, कोल्हापूर ७३ तर सांगली जिल्ह्यातील २५ गावांचा समावेश

France Gold: फ्रान्सची ‘गोल्ड गेम’ स्ट्रॅटेजी! अमेरिकेत ठेवलेल्या सोन्यातून कमावले तब्बल 1.37 लाख कोटी; काय होता प्लॅन?

सुरकुत्या,पिंपल्स, निस्तेज त्वचा? ‘हे’ 5 सुपरफूड्स वाढवतील कोलेजन अन् देतील ग्लो!

Latest Marathi News Live Update : पुण्यात कोपा मॉलला धमकी! व्यवस्थापनाच्या ईमेलवर संशयास्पद मेल, पोलिसांत गुन्हा दाखल

School Book Purchase Rules : शाळांनी वह्या-पुस्तकांसाठी अडवणूक केली तर थेट तक्रार करा; शिक्षण संचालकांचा शाळांना इशारा, पालकांना केलं आवाहन

SCROLL FOR NEXT