covid19 Sakal Media
पुणे

कडूस येथे उद्यापासून सात दिवस जनता कर्फ्यू

वैद्यकीय सेवा व दुध संकलन केंद्र वगळता बाकी सर्व बंद राहणार

महेंद्र शिंदे

कडूस : कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडूस (ता.खेड) ग्रामस्थांनी मंगळवार (ता. 20) दुपारी एक वाजल्यापासून सात दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात वैद्यकीय सेवा व दुध संकलन केंद्र वगळता गावातील दारू विक्री दुकानांसह सर्व दुकाने, हॉटेल, आस्थापना बंद राहणार आहेत. या जनता कर्फ्युला नागरिकांनी साथ देण्याचे आवाहन सरपंच निवृत्ती नेहेरे व ग्रामस्तरीय कोरोना प्रतिबंध समितीने केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कडूस गावात कोरोना रुग्णांच्या संख्येत वेगाने वाढ होत आहे. ही वाढ चिंताजनक आहे. सध्या गावाच्या कार्यक्षेत्रातील वेगवेगळ्या वस्त्यांवर दहा ऍक्टिव्ह रुग्ण असून अनेकांना आरोग्याचा काहीना काही त्रास होत आहे. ऍक्टिव्ह रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. ग्रामस्थांचा जीव टांगणीला लागला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामस्तरीय कोरोना प्रतिबंधक समिती व ग्रामस्थांची तातडीची बैठक झाली. यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सात दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय आला. हा जनता कर्फ्यु मंगळवारी (ता.20) दुपारी एक वाजल्यापासून मंगळवार (ता. 27) सकाळी सहा वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. या जनता कर्फ्युतून फक्त दवाखाने, औषधांची दुकाने व दुध संकलन केंद्रांना सूट देण्यात आली आहे. दूध उत्पादकांचे नुकसान होऊ नये, यासाठी फक्त दूध संकलन केंद्रांना यातून सूट देण्यात आली असून दूध संकलनासाठी शेतकऱ्यांनी मास्कचा वापर करणे अत्यावश्यक असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे. जनता कर्फ्यूच्या कालावधीत गावातील भाजी विक्रेते, हॉटेल, किराणा दुकाने, दारू विक्रीसह सर्व आस्थापना बंद राहणार आहे.

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे, तसेच विनामास्क फिरणाऱ्यांना एक हजार रुपये दंड आकारण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. यावेळी ग्रामस्तरीय कोरोना प्रतिबंध समिती अध्यक्ष तथा सरपंच निवृत्ती नेहेरे, उपसरपंच कैलास मुसळे, मंडलाधिकारी एच.ए.सोनवणे, तलाठी बी.एस.राठोड, तंटामुक्ती ग्रामसमिती अध्यक्ष बाळासाहेब बोंबले, पोलीस पाटील सुशील पोटे, ग्रामपंचायत सदस्य गणेश मंडलिक, बारकू गायकवाड, अनिकेत धायबर, अरुण शिंदे, सुधा पानमंद, मारुती जाधव, बबलुभाई शेख उपस्थित होते. याबाबत गावात दवंडीद्वारे तसेच दारोदारी फिरून कोरोना प्रतिबंध समितीच्या सदस्यांनी जनता कर्फ्युला साथ देण्याचे आवाहन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Omraje Nimbalkar: उद्धव ठाकरे अन् आदित्य ठाकरेंबद्दल ओमराजे पहिल्यांदाच बोलले; कोर्टाच्या निकालावरही दिली प्रतिक्रिया

Udgir News : मुंबई–लातूर–बिदर सुपरफास्टला तीन अतिरिक्त डबे; १७२ अतिरिक्त प्रवाशांना लाभ

Maharashtra Weather: मेघगर्जनेसह उष्णतेचा इशारा! राज्यातील 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस पडणार; हवामान विभागाचा अलर्ट

IND A vs AFG A: वैभव सूर्यवंशीला फायनलमध्ये टार्गेट करणार? श्रीलंकेच्या कर्णधाराने दिलं स्पष्ट उत्तर, 'आमचे खेळाडू कोणालाही...'

ती आली, तिने पाहिलं अन् जिंकून घेतलं सारं! ब्लॉकबस्टर ठरली तुंबाडची मंजुळा! दोन आठवड्यांत इतक्या कोटींची कमाई

SCROLL FOR NEXT