arati dudhane 
पुणे

ठाकर समाजातील रानपाखराने चिमणीच्या प्रकाशात उजळवला ज्ञानाचा दिवा

विवेक शिंदे

महाळुंगे पडवळ (पुणे) : आंबेगाव तालुक्यातील कळंब येथील आदिवासी ठाकर समाजातील आरती अनिल दुधाणे या विद्यार्थिनीने दहावी परीक्षेत ८९.४० टक्के गुण मिळविले आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चिमणीच्या प्रकाशात तिने जिद्दीने अभ्यास केला. आई व वडील दोघे निरक्षर असूनही तीने हे यश मिळविले. तीच्या या यशाचे पंचक्रोशीतील नागरिकांनी कौतुक केले आहे.

आॅनलाइनचा नवा फिटनेस फंडा
      
लौकी प्राथमिक शाळेतील शिक्षक, पालक व ग्रामस्थांनी ठाकरवस्तीतील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. त्यासाठी सुधीर चिखले, विद्या वाघ, बबन सानप, गुलाब थोरात, मनोज बोरा आदी शिक्षकांनी ठाकरवस्तीवर जाऊन पालकांचे समुपदेशन केले. त्यानंतर आरतीसह ३५ हून अधिक मुलांनी लौकी शाळेत प्रवेश घेतला. उपयुक्त शैक्षणिक साहित्य पुरवठा व सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्तीमुळे गळती-स्थगिती थांबल्याने मुले व मुली शिक्षणात स्थिरावली. 

आरती हिने इयत्ता आठवीमध्ये कळंब येथील कमलजादेवी विद्यालयात प्रवेश घेतला. तीने इयत्ता दहावीच्या परीक्षेत ८९.४० टक्के गुण मिळवले. कमलजादेवी विद्यालयाच्या मुख्याध्यापक पौर्णिमा चव्हाण, वर्गशिक्षक एस. एम. खोडगे, राजू आडे या शिक्षकांचे तीला मार्गदर्शन मिळाले. ज्ञानलक्ष्मी राष्ट्रीय विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मनीषा कानडे व साने गुरुजी कथामाला पुणे जिल्हा समितीचे अध्यक्ष बाळासाहेब कानडे यांनी आरती हिचा घरी जाऊन सन्मान केला. 

कानडे म्हणाले की, ‘‘आरतीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक कामगिरी केली. या पुढील शिक्षणासाठी तिला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT