khadakwasla.jpg 
पुणे

खडकवासला धरण साखळीत सुमारे २८ टक्के पाणीसाठा

राजेंद्रकृष्ण कापसे

खडकवासला : खडकवासला साखळीतील चार धरणात मिळून आज गुरुवार दिनांक २४ जून २०२१ रोजी सकाळी सहा वाजता एकूण ८.११ टीएमसी म्हणजे २७.८३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. असे खडकवासला पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अधिकारी विजय पाटील यांनी सांगितले.

मागील वर्षीपेक्षा यंदा जास्त पाणीसाठा

मागील वर्षी आजच्या दिवशी चार ही धरणात मिळून ५.७२ टीएमसी म्हणजे १९.६३ टक्के पाणीसाठा जमा होता. यंदा तो ८.११ टीएमसी म्हणजे २७.८३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. म्हणजे मागील वर्षी पेक्षा २.३९० टीएमसी म्हणजे ८.२ टक्के जास्त पाणीसाठा जास्त जमा आहे.

टेमघरला येवा सुरु

चार ही धरणात बुधवारी दि.१६ जून रोजी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होण्यास सुरवात झाली. चार ही धरणात मिळून ६.६२ टीएमसी यंदाचा सर्वात कमी पाणीसाठा शिल्लक होता. आज अखेर तो ८.११ टीएमसी म्हणजे झाला आहे. म्हणजे सात दिवस आज अखेर १.४९० टीएमसीने पाणीसाठा वाढला आहे. पानशेत, वरसगाव व टेमघर मध्ये अनुक्रमे ७९, ५१ व १६ क्यूसेकने येवा जमा होत आहे.

बुधवारी संध्याकाळी झाला पाऊस

बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत खडकवासला टेमघर येथे पाऊसच पडला नाही. पानशेत, वरसगाव येथे अवघा एक- एक मिलिमीटर पाऊस झाला होता. असे असले तरी बुधवारी संध्याकाळी पाच नंतर पाऊस वाढला. गुरुवार पहाटे सहा वाजे पर्यत खडकवासला २, टेमघर येथे १५, पानशेत, वरसगाव येथे प्रत्येकी ८ तर दासवे लवासा ३८ मिलिमीटर पडला आहे. शनिवार पासून खडकवासला साखळीतील पावसाचा जोर फार कमी झाला. परिणामी धरणाच्या पाणी साठ्यातील वाढ देखील हळूहळू होत आहे.

गुरूवारी सकाळी सहा वाजता चार ही धरणातील पाणी साठ्याची स्थिती :

धरणाचे नाव- एकूण क्षमता टीएमसी / उपयुक्त साठा टीएमसी / टक्केवारी

खडकवासला- १.९७ / १.१३ / ५७.४७ %

पानशेत- १०.६५ / ३.८६ / ३६.२८ %

वरसगाव- १२.८२ / २.५९ / २०.२५ %

टेमघर- ३.७१ / ०.५२ / १३.९७ %

चार धरणात एकूण- २९.१५ / ८.११ / २७.८३%

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT