ABVP Protest Problem in Pune university Exam
ABVP Protest Problem in Pune university Exam 
पुणे

#WakeupSPPU : पुणे विद्यापीठ परीक्षेतील गोंधळ विरोधात 'अभाविप'ची मोहिम

सकाळन्यूजनेटवर्क

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सराव परीक्षा सुरू झालेल्या असताना त्यात विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याविरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे 'वेकअप एसपीपीयू' ही मोहीम सोशल मिडीयावर सुरू केली आहे. गेल्या ३ महिन्यापासून पुणे विद्यापीठ प्रशासन ऑनलाईन परीक्षांचे नियोजन करीत आहे. या सत्राची मुख्य परीक्षा येत्या १० एप्रिल पासून नियोजित आहे आणि त्या पूर्वी सध्या सराव परीक्षा घेण्यात येत आहेत. ऑनलाईन सराव परीक्षा देत असताना विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी गरजेचे असलेले लॉग इन आयडी, पासवर्ड अनेक विद्यार्थ्यांना अद्यापही प्राप्त झालेला नाही.

प्रश्नांची दिलेली उत्तरे सेव्ह होत नाहीत, विद्यापीठाने दिलेल्या तक्रार निवारण कक्षाचा संपर्क क्रमांकावर संपर्क केला असता विद्यापीठ प्रशासन प्रतिसाद देत नाही, या तक्रारी समजून घेण्यासाठी विद्यापीठाकडून कोणतेही यशस्वी प्रयत्न होतना दिसत नाहीत, या सत्राच्या मुख्य परीक्षेसाठी एक आठवड्याहुन कमी कालावधी बाकी असताना अद्यापही काही अभ्यासक्रमांचे वेळा पत्रक जाहीर केले गेले नाही. 

हेही वाचा - आरटीईच्या २५ टक्के जागांवरील प्रवेशाची सोडत बुधवारी होणार जाहीर

या सर्व बाबींमुळे विद्यार्थ्यांचे संभ्रम आणि चिंता वाढत आहे, या अनुषंगाने अभाविप पुणे महानगराच्या वतीने  'सोशल मीडिया' वर '#WakeUpSPPU' मोहीम चालवली गेली आणि यात अनेक विद्यार्थ्यांनी सामील होऊन विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात रोष व्यक्त केला. विद्यार्थ्यांना येत असणाऱ्या समस्यांबाबत सोशल मीडिया वर व्यक्त होऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्रश्नासनाला जागे करण्याचा प्रयत्न या मोहिमेतून करण्यात आला. 

कोरोना या महामारीच्या वातावरणात प्रत्यक्ष आंदोलन करणे योग्य नसले तरी देखील विद्यापीठाच्या या  कारभारामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची मानसिकता या मुळे निर्माण होत आहे." असे अभाविप पुणे महानगर मंत्री शुभम भुतकर यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DY Chandrachud: भारतातील न्यायालये लोकशाहीच्या चर्चेचे ठिकाण; ब्राझीलमधील J20 परिषदेत डी वाय चंद्रचूड यांचे स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update: जागृतीनगर ते घाटकोपर दरम्यान सुरु असलेली मेट्रो संध्याकाळी 6 वाजल्यापासून बंद राहणार

Vastu Tips: नवीन हॉटेल सुरू करताना कोणते नियम पाळावे, वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Bank Fraud: कोण आहे धीरज वाधवान? ज्याने विजय मल्ल्या अन् नीरव मोदीपेक्षाही केलाय मोठा स्कॅम

Amit Shah: POK भारताचे आहे अन् आम्ही ते परत घेऊ; अमित शाह यांचा इशारा

SCROLL FOR NEXT