Accident sakal
पुणे

भिगवण राशीन रोडवरील अपघातीत दुचाकीस्वार ठार; एक जखमी

जखमींना उपचारांसाठी बारामती येथील खासगी रुग्नालयांमध्ये दाखल करण्यात आले होते, त्यापैकी वसीम दाऊद शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

प्रा. प्रशांत चवरे

भिगवण : येथील भिगवण राशीन रोडवर भुसा वाहतुक करणाऱ्या आयशर टेम्पोची दुचाकीला धडक (Accident) बसुन झालेल्या अपघातांमध्ये भिगवण स्टेशन(ता.इंदापुर) येथील एका युवकाचा मृत्यू झाला आहे तर एक गंभीर जखमी झाला असल्याची माहिती भिगवण पोलिस ठाण्याचे (Bhigvan Police Station) सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.

अपघातांमध्ये वसीम दाऊद शेख (वय. ३८ रा. भिगवण स्टेशन,ता.इंदापुर) यांचा मृ्त्यू झाला तर जावेद गुलामहुसेन शेख (वय. ४० रा. भिगवण स्टेशन, ता.इंदापुर) हे गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत भिगवण पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः येथील भिगवण राशीन रोडवरुन भिगवण बाजुकडुन राशीन बाजुकडे भुसा वाहतुक करणारा आयशर टेम्पो(एम. एच. २५ ए.जे. ००५५) निघाला होता. तक्रारवाडी(ता.इंदापुर) येथे चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने टेम्पोने दुचाकीस जोरदार धडक दिली व टेम्पो समोरील इलेक्ट्रीक खांबावर आदळुन पलटी झाला. या अपघातांमध्ये दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले होते. गंभीर जखमींना उपचारांसाठी बारामती येथील खासगी रुग्नालयांमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यापैकी वसीम दाऊद शेख यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

टेम्पोची इलेक्ट्रीक खांबाला धडक बसल्यामुळे खांब तुटुन त्या ठिकाणी विजेच्या धक्का बसण्याचा धोका निर्माण झाला होता. विदयुत महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ विदयुत पुरवठा खंडीत केला. अपघातामुळे भिगवण राशीन रस्त्यावर मोठी वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. भिगवण पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत वाहतुक सुरुळीत केली. अपघातांमध्ये त्या ठिकाणी असलेल्या भाजी विक्रेत्यांचेही मोठे नुकसान झाले. अधिक तपास भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलिस करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारत आणि झिम्बाब्वेचे खेळाडू दुसऱ्या T20I सामन्यात हाताला काळी पट्टी बांधून का उतरले? जाणून घ्या खरं कारण

सध्या काय करतात 'पंढरीची वारी' चित्रपटातील कलाकार? बालकलाकारासह अनेकांचं निधन; केवळ तिघेच जिवंत

Karjat Lonavala railway block : कर्जत-लोणावळा घाटातील तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम वेगात; २५ ते २८ जुलैदरम्यान अनेक एक्स्प्रेस रद्द

धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मंजूर! शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार कोण पाहणार? मोदी सरकारने 'या' मंत्र्यावर सोपवली जबाबदारी

IND vs WI ODI Squad: यशस्वी, ऋतुराज IN; श्रेयस, इशान, बुमराहसह ७ खेळाडू OUT! वेस्ट इंडिजविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी भारताचा संभाव्य संघ... असं का होणार?

SCROLL FOR NEXT