accident.jpg 
पुणे

पुणे- नगर रस्त्यावर अपघात; पोलिस निरीक्षकासह पाच जण जखमी 

सकाळवृत्तसेवा

तळेगाव ढमढेरे (पुणे) : पुणे- नगर रस्त्यावर कासारी फाटा (ता. शिरूर) येथे नगरहून पुण्याकडे निघालेल्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या मोटारीला पाठीमागून ट्रकची धडक बसली. त्यात गडकरी यांच्यासह पाच जण जखमी झाले. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगर पोलिस नियंत्रण कक्षातील महिला पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी मोटारीतून पुण्याकडे निघाल्या होत्या. कासारी फाटाजवळ पाठीमागून आलेल्या ट्रकची त्यांच्या मोटारीला धडक बसली. मोटार समोरून चाललेल्या छोट्या टेंपोवर आदळली. टेंपो उलटला. मोटार दुभाजकावर आदळल्याने टायर फुटला.

मोटारीला धडकलेला ट्रकही दुभाजकावर चढला. या विचित्र अपघातात गडकरी यांच्यासह लक्ष्मण शालींग नाईक (वय 23, रा. घाटनांदूर, ता. आंबेजोगाई, जि. बीड), टेंपोमधील रुक्‍मिणीबाई क्षीरसागर, ओम माळवदकर, श्रावणी माळवदकर (सर्व रा. परळी, जि. बीड) हे जखमी झाले आहेत. शिक्रापूर पोलिसांनी ट्रकचालक कृष्णा लक्ष्मण कंकाळ (रा. नायगाव, ता. हवेली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

साहिल मोबाईल वापरून करत होता कॉपी, परीक्षेवेळचा CCTV VIDEO आला समोर

Mohol News : मोहोळ तालुक्यातील मंदिरातील वाढत्या चोऱ्या संदर्भात पोलीस सतर्क; व्यवस्थापक पुजारी व ट्रस्टी यांच्या तातडीच्या बैठकीचे आयोजन, अकरा सूचनांचे पालन करण्याची सूचना

Mangalwedha News : मनरेगा योजनेतील रोजगार सेवकासाठी नव्याने काढलेल्या शासन निर्णयावरून राज्यभरात संताप

IIT Bombay Student Death : आयआयटी बॉम्बे बाहेर 'जस्टिस फॉर साहिल' आंदोलन; प्रकाश आंबेडकरांचे पुत्र सुजात यांच्या नेतृत्वाखाली जोरदार निदर्शने, प्रशासनाला दिला कडक इशारा

IAS मेधा रूपम यांना दिलासा, हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती

SCROLL FOR NEXT