accident pune nashik road.jpg 
पुणे

पुणे-नाशिक महामार्गावर उलटली शिवशाही बस; अपघातात 'एवढे' जण...

विवेक शिंदे

महाळुंगे पडवळ (पुणे) : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर कळंब (ता.आंबेगाव) येथे नाशिक ते पुणे शिवशाही बस रविवारी (ता. २३) रात्री सव्वा नऊ वाजता पलटी झाली. अपघातात बसमधील आठ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. याबाबत एसटीचे चालक मनोहर देवमाने आहेर (वय ५८) यांनी मंचर पोलिस ठाण्यात सोमवारी (ता. २४) फिर्याद दिली आहे.        

शिवशाही बस (एम. एच. ०६, बी. डब्लू ०६४१) पुण्याकडे जात होती. कळंब गावानजीक आल्यानंतर विरुद्ध दिशेने चारचाकी अचानकपणे एसटीच्या समोर आली. चालक आहेर यांनी एसटी डाव्या बाजूला घेतल्याने बस खड्‌ड्यात पलटी होऊन अपघात झाला. अपघातामध्ये बसमधील आठ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे.

उद्योजक नितिन भालेराव व ग्रामस्थांनी जखमी प्रवाशांना मंचर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्त बस रस्त्यालगत असल्याने मंचर व नारायणगावच्या बाजूने वाहनांची कोंडी झाली होती. मंचर पोलिस व ग्रामस्थांनी अपघातग्रस्त बस बाजूला केल्यानंतर वाहतूक पूर्ववत सुरु झाली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सचिन अंबादाज महाले (वय २३), पत्नी रुपाली सचिन महाले (वय २२, दोघे रा.भोसरी-पुणे) यांच्यासह आठ जणांना (नावे माहीत नाही) किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु होते. नारायणगावचे आगार प्रमुख विठे यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णांची विचारपूस केली आहे. मंचर पोलिस पुढील तपास करत आहेत.  


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI statement on India vs Pakistan match: मोठी बातमी! भारत-पाकिस्तान मॅचबद्दल अखेर 'BCCI'ने स्पष्ट केली भूमिका

Sanjay Raut : आरक्षणावरून राज्यात अराजक; मुख्यमंत्र्यांनी भूमिका स्पष्ट करावी

PM Modi AI video: पंतप्रधान मोदी अन् त्यांच्या आईंचा 'AI' व्हिडिओ प्रकरणी, आता काँग्रेस 'IT' सेलच्या नेत्यांविरुद्ध 'FIR' दाखल!

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

SCROLL FOR NEXT