Crime_Murder 
पुणे

'मुलाला वाचवायचं असेल तर ५ लाख द्या'; खुनाची धमकी देत महिला डॉक्‍टरकडे मागितली खंडणी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पतीने तुमची आणि मुलाच्या हत्येची पाच लाख रुपयांना सुपारी दिली आहे. मात्र मी मुलांच्या हत्येची सुपारी घेत नाही. पण मुलाला वाचवायचे असेल तर मला पाच लाख रुपये द्यावे लागतील, असे म्हणत खुनाच्या धमकीने खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी, बिबवेवाडी-कोंढवा रोड परिसरातील एका डॉक्‍टर महिलेने मार्केटयार्ड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी 24 तासात तपास करून आरोपी राकेश नरेश पाटील (रा. सय्यदनगर, मूळ. छत्तीसगड) याला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला डॉक्‍टर आहेत. त्यांचे कोंढवा परिसरात क्‍लिनिक आहे. सोमवारी (ता.11) सकाळी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने फोन केला. "मै..कुरेशी बात कर रहा हूँ. तुम्हारे पतीने तुम्हारी और तुम्हारे बच्चे की पाच लाख रुपये मे मर्डर करणे की सुपारी दी है. मै बच्चों की सुपारी नही लेता. तुम्हारे बच्चों को बचाना है तो 5 लाख रुपये दो, असे बोलून आरोपीने फिर्यादींच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. त्यामुळे डॉक्‍टर महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या गुन्ह्याच्या अनुषंगाने तांत्रिक विश्‍लेषनाद्वारे तपास करत असताना, पोलिस निरीक्षक दुर्योधन पवार यांना माहिती मिळाली होती की, खंडणीची मागणी करणारा संशयित व्यक्ती सय्यदनगर परिसरात सुरू असलेल्या बांधकामाच्या ठिकाणी काम करतो. त्यानुसार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संतोष शिंदे कर्मचारी अनिस शेख, स्वप्नील कदम यांच्या पथकाने आरोपीला अटक केली.

कोरोना सेवकांच्या वेशात जाऊन केली अटक :
पाटील हा सय्यदनगर येथील सेंट्रिंगच्या कामावर असल्याची माहिती मार्केटयार्ड पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस कोरोना सेवकाच्या वेशात बांधकाम साइटवर पोचले. त्यानंतर तेथील सर्व कामगारांना विश्वासात घेत आपण कोरोना संबंधित सर्व्हे करण्यासाठी आलो असल्याचे सांगत सर्वांचे मोबाईल क्रमांक घेऊन तपासणी केली. त्यावेळी राकेशच्या नंबरवरूनच डॉक्‍टर महिलेचा फोन आल्याचे स्पष्ट झाले. त्याच्या मोबाईलमध्ये फिर्यादींचा क्रमांक देखील मिळाला.

फिर्यादी महिलेच्या पतीच्या सांगण्यावरून आरोपीने खंडणीबाबत फोन केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून समोर आलेले नाही. त्यामुळे आरोपीने हा सर्व प्रकार नक्की कोणाच्या सांगण्यावरून केला याचा तपास करीत आहेत. न्यायालयाने आरोपीची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.
- दुर्योधन पवार, पोलिस निरीक्षक

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR वैधच! निवडणूक आयोगाला मतदार यादीतून नाव हटवण्याचा आणि समाविष्ट करण्याचा पूर्ण अधिकार : सुप्रीम कोर्ट

Earbuds Safety Tips : कानातले इअरबड्स बनतील 'जाजूस'; पर्सनल बोलणं होऊ शकतं लिक, त्यामुळं चुकूनही सुरू ठेवू नका 'ही' 1 सेटिंग

Gokul Milk Halal Clarification : गोकुळ दूध संघाने हलाल प्रमाणपत्र का घेतलं? परिपत्रकाद्वारे केला खुलासा; 'हलाल' शब्दाचा अर्थही सांगितला

Railway Ticket Price: रेल्वे तिकीटाचे दर वाढणार! प्रवाशांचा खिशाला फटका बसणार; रेल्वे प्रशासन मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

शेतकऱ्याच्या मुलीला वसतीगृहातून बाहेर काढण्याचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांकडे कूलरबाबत केलेल्या तक्रारीच्या रागातून कारवाई

SCROLL FOR NEXT