Crime_Rape 
पुणे

पुण्यातील धक्कादायक घटना; अल्पवयीन मुलीवर तिघांनी बलात्कार करून झाडली गोळी

सकाळ वृत्तसेवा

पुणे : वाढदिवसाचा बहाणा करून अल्पवयीन मुलीवर तिघांनी बलात्कार केला. त्यानंतर मुलीवर गोळी झाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. ही घटना मागील आठवड्यात घडली. याप्रकरणी जनता वसाहत येथे राहणाऱ्या 16 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे. त्यावरुन 5 जणांविरुद्ध अपहरण, बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी आणि पीडित मुलगी हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत.

पीडित मुलगी जनता वसाहत परिसरात राहते. तिच्या मैत्रीणीने मागील आठवड्यात तिच्या एका मित्राच्या वाढदिवसाला वारजे येथे जायचे असल्याचे सांगून पीडितेला तिकडे नेले. दरम्यान, वाढदिवस झाल्यानंतर आरोपींनी फिर्यादी मुलीला एका खोलीत नेले. तिथे तिघांनी तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर मुलगी घरी जाण्यास निघाली. त्यावेळी आरोपींनी तेवढ्यावरच न थांबता आरोपीने त्यांचे आणखी दोन मित्र येणार असल्याचे सांगितले. त्यावेळी फिर्यादी मुलीने त्यास नकार देऊन घरी जायचे असल्याचे सांगितले. या प्रकारामुळे चिडलेल्या आरोपीने खोलीच्या पोटमाळ्यावरील पिस्तुल आणली. पिस्तुलातून मुलीवर गोळी झाडली. मुलीने तिच्याकडील मोबाईल छातीजवळ धरला होता, पिस्तुलाची गोळी मोबाईलवर लागल्याने मुलगी गंभीर जखमी झाली नाही. या घटनेनंतर मुलगी आणि तिची मैत्रीण कात्रज येथे गेल्या, तेथे मुलीवर उपचार केल्यानंतर त्या दोघी घरी गेल्या.

दरम्यान, बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट 2 च्या पथकाने एका आरोपीस अटक केली होती. संबंधित आरोपीची चौकशी केल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. या वृत्तास दत्तवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी दुजोरा दिला.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT