पुणे

Ravindra Dhangekar : भाजपकडून पुण्यात पैसे वाटल्याचा आरोप, काँग्रेस उमेदवार धंगेकरांचं पोलिस ठाण्यात धरणे आंदोलन

संतोष कानडे

Pune Loksabha election 2024 : पुण्यात भाजपकडून मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप काँग्रेसकडून होत आहे. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे सहकार नगर पोलिस ठाण्यात धरणे आंदोलनाला बसले आहेत.

सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. या प्रकरणी तक्रार करूनही पोलीस कारवाई करत नसल्याचा धंगेकरांचा आरोप आहे. पोलीस प्रशासनाविरोधात रवींद्र धंगेकर आक्रमक झाले आहेत. त्यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यातच ठिय्या मांडला आहे.

रविवारी रात्री उशिरापर्यंत आमदार रवींद्र धंगेकर यांचं सहकार नगर पोलीस ठाण्यातच धरणे आंदोलन सुरुच होतं. जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत पोलीस ठाण्यातून उठणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sikandar Shaikh Arrested : महाराष्ट्र केसरी सिकंदर शेख अवैध पिस्तुल विक्री प्रकरणी अटक; राजस्थानातील कुख्यात टोळीशी संबंध उघड, कुस्ती क्षेत्रात खळबळ

Pro Kabaddi Final 2025: दबंग दिल्लीने मारली बाजी! पुणेरी पलटनला अटीतटीच्या लढतीत केले पराभूत, २ गुणांनी रोमहर्षक विजय

Sanjay Raut: शत्रूपक्षातील सौहार्द! संजय राऊतांची प्रकृती बिघडली; नरेंद्र मोदींचा ‘गेट वेल सून’ संदेश, खासदारांनी दिलं भावनिक उत्तर

चुकीचे काम करावे, नोकरी सोडावी म्हणून ‘फायनान्स’मधील तरुणीचा विनयभंग, छळ! ब्रॅंच मॅनेजर, सेल्स मॅनेजर, एरिया क्रेडिट मॅनेजर, लिगल हेडसह १० जणांवर गुन्हा

Kannad News : कन्नड नगरपरिषदेच्या विकासकामांसाठी ९ कोटी २६ लाखांचा निधी मंजूर

SCROLL FOR NEXT