पुणे

बंगेराकडूनच आरोपींना शस्त्र प्रशिक्षण

सकाळवृत्तसेवा

पुणे - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे संशयित मारेकरी सचिन अंदुरे व शरद कळसकर यांना राजेश डी. बंगेरानेच शस्त्र प्रशिक्षण दिले आहे; तसेच दाभोलकर यांच्या हत्येच्या कटासाठी अमित रामचंद्र डिगवेकरने रेकी केली होती, असा दावा शनिवारी सीबीआयने न्यायालयात केला. शुक्रवारी सायंकाळी सीबीआयने बंगळूरमधून बंगेरा व डिगवेकरला अटक केली. शनिवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात दोघांना सचिन अंदुरेसह हजर केले. या वेळी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. आर. भळगट यांनी बंगेरा व डिगवेकरला १० दिवसांची सीबीआय कोठडी सुनावली; तर सचिन अंदुरेला न्यायालयीन कोठडी सुनावली. 

बंगेराने महाराष्ट्र व कर्नाटकमध्ये अनेक ठिकाणी अंदुरे व कळसकरला शस्त्र चालवण्याचे प्रशिक्षण दिले, त्याबाबत पैसा कोणी पुरवला, नियोजन कोणी केले, याचा तपास करायचा आहे; तसेच अमित डिगवेकर कटातील एक मुख्य सूत्रधार असून, त्याने दाभोलकर यांचे घर, मॉर्निंग वॉकला जाण्याची वेळ, ठिकाण आदी बाबींची माहिती मारेकऱ्यांना पुरवली, असा दावा सीबीआयचे वकील ॲड. विजयकुमार ढाकणे यांनी करून १४ दिवसांच्या सीबीआय कोठडीची मागणी केली. त्याला विरोध करताना बंगेरा व डिगवेकरचे वकील ॲड. समीर पटवर्धन यांनी युक्तिवाद करताना ‘सीबीआय याआधी सारंग अकोलकर व विनय पवार हेच मुख्य मारेकरी आहेत, असा दावा करत होती, आता नवीन थिअरी सीबीआय मांडत आहे, असे सांगितले. 

अमित डिगवेकर १५ वर्षांपासून गोव्यात
अमित डिगवेकरची भूमिका सूत्रधाराची असून, तो मागील १५ वर्षांपासून गोव्यातील फोंडा येथे सनातन संस्थेच्या आश्रमात राहत होता; तर राजेश बंगेरा कर्नाटकमध्ये काँग्रेसच्या आमदाराचा खासगी सहायक (पीए) होता, अशी माहिती सीबीआयच्या वकिलांनी न्यायालयात दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT