paud.jpg 
पुणे

अबब ! ...म्हणून मुळशी तालुक्यात तब्बल ५७२ जणांवर करण्यात आली कारवाई

गोरख माझिरे

कोळवण (पुणे) : पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विना मास्क फिरण्यास बंदी असून सोशल डिस्टन्स ठेवणे बंधनकारक आहे. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी याकरिता पौड पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी हे पौड पोलिस स्टेशन हद्दीमध्ये भूगाव, पिरंगुट, भुकूम, घोटावडे, पौड, लवासा, मुळशी, अंबावणे, माले, घोटावडे फाटा , कासार आंबोली, उरवडे, कोळवण या गावांमध्ये विना मास्क फिरणारे व सोशल डिस्टन्स न ठेवणाऱ्या एकूण 572 नागरिकांवर कारवाई केली. यामध्ये 427 नागरिकांवर भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून 145 नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यामध्ये त्यांच्या कडून 72, 500 एवढा दंड वसूल करण्यात आला आहे.  
 

यावेळी हद्दीतील नागरिकांना विना मास्क फिरू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. इथून पुढे विना मास्क फिरणाऱ्या व सोशल डिस्टन्स न ठेवणाऱ्या नागरिकांवर अशाच प्रकारची कारवाई चालू ठेवणार असल्याचे पौड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांनी सांगितले

सदर कारवाई पौड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भालचंद्र शिंदे, पोलिस उपनिरिक्षक रेखा दुधभाते, अनिल लवटे, श्रीकांत जाधव, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र शितोळे, सिकंदर मुजावर, पोलिस हवालदार संदीप सपकाळ, संतोष कुंभार, अब्दुल शेख, बाबा शिंदे, मंगेश लांडगे, विनोद कांबळे, सुनील मगर, रावसाहेब गायकवाड, शंकर नवले, पोलिस नाईक सागर बनसोडे, विजय कांबळे, जय पवार, नितीन गार्डी, नंदू आडारी, नितीन कदम, चंद्रशेखर हगवणे, सातेंद्र वागवले, संजय सुपे, पोलिस शिपाई मयुर निंबाळकर, गणेश साळुंखे, नामदेव मोरे, सुहास सातपुते, रवींद्र जाधव, प्रशांत बुणगे, विनोद चोबे, सुनील कदम, नाना मदने, प्रशांत तुरे, महेश पवार, श्रीधर जगदाळे, तृप्ती  माकर यांनी केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT