baramati.jpg
baramati.jpg 
पुणे

लोणंद व नीरा परिसरातून अवैधरित्या दारु विक्रीवर कारवाई

मिलिंद संगई

बारामती : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयंत मीना यांची जोरदार कारवाई सुरुच आहे. आज मांडवगण फराटा, शिरुर परिसरात निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर लोणंद व नीरा परिसरातून अवैधरित्या दारु विक्रीसाठी नेली जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

जयंत मीना तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या सूचनेनुसार सहायक पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव, फौजदार साळुंखे, पोलीस कर्मचारी शिवाजी निकम, संदीप जाधव, दशरथ कोळेकर, स्वनिल अहिवळे, अभिजित एकशिंगे, संदीप कारंडे, शर्मा पवार, सदाशिव बंडगर यांनी मोरगावच्या चौकात सापळा रचला होता. 

आज इको गाडीतून दारुचे बॉक्स अवैधरितीने वाहतूक करताना पकडण्यात आले. या कारवाईत 40 देशी दारुचे बॉक्स, 38 हजार रुपये रोकड, दोन मोबाईल हँडसेट असा एकूण तीन लाखांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी धनंजय मानसिंगराव काकडे, अभिजीत भारत कोटे (दोघेही रा. नीरा, ता. पुरंदर) व सूरज दत्तात्रय जाधव (रा. सोमेश्वर, ता. बारामती) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam : ''माझी घरवापसी होतेय, तीस वर्षांनंतर पुन्हा शिवसेनेत...'', संजय निरुपम यांचा पक्षप्रवेश ठरला

AstraZeneca Covid Vaccine Side Effects: किती ट्रायल घेतल्यानंतर कोविशील्ड लसीला मंजूरी मिळाली? आता का होतायत आरोप?

Smart TV Tips : Smart TV सतत बंद पडते, सिग्नल जातो तर घरीच करा ठिक, या टिप्स वापरून पहा

Latest Marathi News Live Update: उद्धव ठाकरेंची विकेट आधीच पडलीए, ते क्लीनबोल्ड झालेत; CM शिंदेंना विश्वास

Satara News : आमदार मकरंद पाटील उदयनराजेंच्या प्रचारात दिसत नाहीत; शंभूराज देसाईनी सांगितलं हे कारण

SCROLL FOR NEXT