sahkarnagar.jpg 
पुणे

सातारा रस्त्यावरील भाजी विक्रेत्यांवर...

अजित घस्ते

सहकारनगर (पुणे) : शहरात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे गर्दी टाळणे हा कोरोना वरचा एकमेव प्रभावी उपाय आहे. मात्र, शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर भाजीपाला, फळे, कांदा-बटाटा विक्रीमुळे प्रचंड गर्दी होत आहे. रस्त्यांवर होणार्‍या विक्रीमुळे वाहन चालकांना व शेजारी असणाऱ्या सोसायट्यांना याचा त्रास सहन करावा लागत होता म्हणून सातारा रस्त्यावर शुक्रवारी सकाळच्यावेळी बिबवेवाडी महापालिका अतिक्रमण विभाग व सहकारनगर वाहतूक पोलिसांनी रस्त्यावरील भाजी विक्री त्यांवर संयुक्त अशी कारवाई केली.

यावेळी अतिक्रमण निरीक्षक मेघा राऊत म्हणाल्या, कोरोनाचा विषाणूच्या प्रार्दुभावाचा धोका लक्षात घेऊन शिवनेरी रस्ता, सातारा रस्त्यावरील सिटी प्राईड, पुष्पमंगल चौक, पद्मावती इ. रस्त्यांवर भाजी विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

तर वाहतूक विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लेखाजी शिंदे म्हणाले, सध्या कोरोनाच्या महामारीमध्ये सातारा रस्त्यावर सकाळच्या वेळी भाजी विक्रते व्यवसाय करीत असल्याने रस्त्यावर गर्दी केली जाते. सोशल डिस्टन्सचे पालन केले जात नसल्याने सातारा रस्त्यावर भाजी विक्री करणाऱ्या 12 वाहनांवर जामर लावून कारवाई करण्यात आली असून 23 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सलग पाचव्या दिवशी सोनं झालं स्वस्त! सर्वसामान्यांना मोठा दिलासा; 1 तोळा सोनं आता कितीला? पाहा आजचा ताजा भाव

Raid On Ambani Companies : अंबानींच्या कंपन्यांवर १० ते १२ ठिकाणी छापेमारी, १५ पथके तपासात

Latest Marathi News Live Update : चार धाम यात्रेसाठी नोंदणी आजपासून सुरू

IAF Sukhoi Crash : आसाममध्ये सुखोई विमान कोसळले; स्क्वाड्रन लेफ्टनंटसह महाराष्ट्राचे सुपुत्र पूर्वेश दुरगकर शहीद

Iran–Israel Conflict: बॉम्ब-मिसाईलच्या सावटाखाली दुबईत अडकले; घरी पोहोचताच ‘जीव भांड्यात पडला’ सातारा, सांगली, रत्नागिरीतील २६ जणांची सुटका

SCROLL FOR NEXT