पुणे

चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई : सुहास चिटणीस

महेंद्र शिंदे

खेड-शिवापूर : "येथील खेड-शिवापूर टोलनाका बनावट पावत्या प्रकरणाची राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानेही (एनएचएआय) स्वतंत्रपणे चौकशी सुरू केली आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाईची कार्यवाही करण्यात येईल," असे 'एनएचएआय'चे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी सांगितले.

पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर काही दिवसांपूर्वी बनावट पावत्यांचे प्रकरण उघडकीस आले होते. त्यात हा टोलनाका 'एनएचएआय'चा आहे. टोल नाक्यावर बनावट पावत्यांचा मोठा गैरप्रकार झालेला असताना 'एनएचएआय' या प्रकरणावर कोणती भूमिका घेणार? असा प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर 'एनएचएआय'चे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी टोलवरील या बनावट पावत्या प्रकरणाची आमच्याकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले.

चिटणीस म्हणाले, "टोल नाक्यावर बनावट पावत्या प्रकरण कसे घडले, त्याला कारणीभूत कोण आहे, याची आमच्या अभियंत्याकडून चौकशी सुरू आहे. हा चौकशी अहवाल आम्हाला प्राप्त झाल्यानंतर तो आमच्या वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल. त्या अहवालानुसार संबंधीतांवर कारवाईची कार्यवाही करण्यात येईल."

टोलची वसुली अजून किती दिवस?"खेड-शिवापूर टोल नाक्यावर बनावट पावत्या प्रकरण उघडकीस आल्यानंतर हा टोल नक्की कोणाच्या खिशात जातो? असा प्रश्न मनात निर्माण झाला आहे. टोल नाक्यावर असे गैरप्रकार करून टोलचे पैसे चोरायचे आणि टोलचा बोजा प्रवाशांच्या माथी मारायचा, असा प्रकार सुरू होता. खेड-शिवापूर टोलवरून आत्तापर्यंत किती रक्कम वसूल झाली. किती रक्कम वसूल करणे बाकी आहे आणि किती रक्कमेच्या टोलची चोरी झाली, या गोष्टी आम्हाला समजल्या पाहिजेत," अशी मागणी नागरीक करत आहेत.

(संपादन : सागर डी. शेलार)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT